फोटो : B61138
विविधांगी कलांनी बहरले ‘कलाकुंभ’
कला, संस्कृती आणि परंपरेचा अनोखा संगम
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. २४ : बासरी, गिटार, तबला वाद्य वादनाची पर्वणी, कवीसंमेलन, नृत्याविष्कार, युद्धकला प्रात्यक्षिक, देशभक्तीपर, शास्त्रीय गायन, भक्तीसंगीत यासारख्या विविधांगी कलांनी बहरलेला ‘कलाकुंभ २०२६’ भारतीय कला, संस्कृती आणि परंपरेचा अनोखा संगम नाशिककरांनी (ता. २४) शनिवारी अनुभवला.
संस्कार भारती नाशिक महानगर व महापालिका यांच्या संयुक्त विद्यमाने सिंहस्थ कुंभपर्वाच्या औचित्याने दोन दिवसीय कार्यक्रम घेण्यात येत आहे. गंगापूर रोड येथील उदाजी मराठा बोर्डिंग कॅम्पस परिसरात सुरू असलेल्या कार्यक्रमाची सुरवात शोभायात्रेने करण्यात आली. तुळजाभवानी मंदिर, प्रसाद सर्कल मार्गाने उदाजी प्रांगणात शंखवादन, लेझीम पथक, कुंभाचे फलक, संबळ वादनाने शोभायात्रेची शोभा वाढली. कुंभपर्वाचे उद्घाटन महापौर हिमगौरी आडके, मविप्र सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे, नगरसेवक स्वाती भामरे, संस्कार भारतीचे अखिल भारतीय मंत्री रवींद्र बेडेकर, संस्कार भारतीचे अध्यक्ष डॉ. पं. अविराज तायडे, सचिव भालचंद्र क्षिरे, संस्कार भारती महामंत्री प्रशांत कुलकर्णी, मुकुंद मराठे यांच्या उपस्थितीत झाले. दिवसभर रंगलेल्या ‘कलाकुंभ’ कार्यक्रमाने एकाच छताखाली विविध कलांचा आविष्कार नाशिककर रसिकांना अनुभवायला मिळाला.
---चौकट
आज (ता.२५) होणारे कार्यक्रम
सकाळी ९ ते ८.३० : शिल्प प्रात्यक्षिक, मुलाखत, देशभक्तिपर गीते, लोकगीत, भक्तीगीत, बासरी वादन, चित्रकारांचे प्रात्यक्षिक, व्याख्यान, नृत्य, नाट्य, एकपात्री, पथनाट्य त्याचबरोबर चित्रकला, हस्तकला, ऐतिहासिक वस्तूंचे प्रदर्शन, फोटोग्राफी प्रदर्शन असणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.