नाशिक

इगतपुरी : विजय पगारे : शिखरस्वामिनी कळसुबाईच्या दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी : नाशिक - नगर जिल्हयासह राज्यभरातील भाविकांचा ओघ :

CD
08816, 08817 कळसूबाई शिखर : शिखरस्वामिनी कळसुमातेच्या हिरव्यागार डोंगरावर दर्शनासाठी भाविकांची झालेली गर्दी. दुसऱ्या छायाचित्रात कळसूबाई देवींची मूर्ती. कळसूबाईच्या दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी नाशिक, अहिल्यानगर जिल्ह्यासह राज्यभरातील भाविकांचा ओघ सकाळ वृत्तसेवा इगतपुरी, ता.१८ : नाशिक, अहिल्यानगर जिल्हयाच्या सीमेवर असलेल्या शिखरस्वामिनी कळसुदेवीच्या दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली. महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कळसूबाई डोंगरावर नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातोय. शिखराच्या पायथ्याशी असलेल्या बारी या छोट्याशा गावातून या डोंगराच्या चढाईस सुरवात होते.समुद्रसपाटी पासून ५ हजार ४०० फूट उंचीवर असलेल्या कळसूबाईच्या दर्शनाची ओढ भाविकांना नवरात्रीत लागलेली असते. डोंगर व कपारीतून ओबड-धोबड रस्त्यावरून पाऊलवाट काढत जीव मुठीत धरत प्रवास करून भाविक आपल्या कळसूबाईचे दर्शन घेत आहेत. मुली आणि महिलांची संख्या लक्षणीय आहे. ------ शिखरस्वामिनी कळसुमातेची अख्यायिका बारी गावातील शिंदे कुटूंबियांनी इंदोरी गावातील खाडे यांची कन्या कळसू हिला दत्तक म्हणून घेतले होते. मात्र दत्तक जाताना कळसूने एक आट घातली होती की, मी कुठल्याही प्रकारची धुणीभांडी, झाडलोट करणार नाही.आणि कोणाच्याही चपला उचलणार नाही. परंतु, या गोष्टीचा खाडे कुटुंबीयांना विसर पडला आणि एका दिवशी त्यांनी कळसूला पाहुण्याची उष्टी भांडी उचलण्यास सांगितल्याने कळसू क्रोधीत झाली. गावाजवळ असलेल्या सर्वात उंच शिखरावर जावून बसली. कळसूला विनवणी करूनही ती खाली आली नाही.अखेर कळसूने शिखरावर एका शिलेचे रूप धारण केले. त्यानंतर हे स्थान कळसूबाईचे स्थान म्हणून नावाने प्रचलित झाले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Satara Farmer Loan Waiver: साताऱ्यात ७,७८९ शेतकरी कर्जमाफीपासून वंचित; कर्जमाफी होऊनही पात्रतेचा खोडा, धक्कादायक कराण आल समाेर!

सासऱ्यांनी सांगितलं एका वर्षाचा आत वजन घटव... कविता मेढेकर यांचा खुलासा, म्हणाल्या, 'माझे सासू-सासरे...'

Spinal Pain: पाठीच्या कण्याच्या आरोग्यासाठी कोणत्या कुशीवर झोपणे योग्य? पाठ टेकून झोपण्याचेही आहेत फायदे!

2026 च्या शेवटच्या 3 महिन्यांची बाबा वेंगांची भविष्य वाणी व्हायरल; ‘या’ राशींबाबत चर्चांना उधाण!

Latest Marathi News Live Update : गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत ९९.७४ टक्के मतदान; ५,४०४ मतदारांचा सहभाग

SCROLL FOR NEXT