नाशिक

नवसाला पावणारी कालिका माता

CD
फोटो : H32936 नवसाला पावणारी कालिका माता --------------------------- प्राचीन इतिहासाचा वारसा लाभलेल्या नाशिकच्या कालिका माता मंदिरात नवरात्रोत्सवात हजारो भाविकांची मांदियाळी जमते. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी १७५० मध्ये केलेल्या जीर्णोद्धारापासून ते आधुनिक मंदिराच्या उभारणीपर्यंतचा प्रवास लाभलेल्या या श्रद्धास्थानात नवसपूर्तीसाठी वर्षभर भाविकांची गर्दी असते. - प्रशांत भरवीरकर कालिका माता म्हणजे नवसाला पावणारी देवी अशी आख्यायिका आहे. मंदिराला प्राचीन इतिहास लाभला आहे. १७ व्या शतकात नाशिकचे पोलिस पाटील स्व. चिमणराव रंगोजी पाटील यांच्या शेतात हे मंदिर होते. सन १७५० मध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला. भाविकांच्या सुविधेसाठी मंदिराशेजारी अहिल्यादेवींनी एक बारव खोदली. मंदिराचा जीर्णोद्धार करताना २० बाय २० फूट आकाराचे पत्र्याचा सभामंडप बांधण्यात आले. तसेच मंदिरासाठी विश्वस्त मंडळ नेमण्यात आले. तत्कालीन पोलिस पाटील स्व. कृष्णराव पाटील यांनी या मंदिरासाठी मोठे योगदान दिले आहे. १९५० मध्ये या मंदिराच्या व्यवस्थापनासाठी तीन विश्वस्तांचे मंडळ नेमण्यात आले. सातत्याने ३५ वर्षे स्व. गुलाबराव कृष्णराव पाटील मंदिराचे व्यवस्थापकीय विश्वस्त होते. या काळात मंदिराचा सर्वांगीण विकास झाला. १९७४ मध्ये या मंदिराचा जीर्णोद्धार झाला. आर्किटेक्ट ग. ज. म्हात्रे यांनी सध्याच्या मंदिराचा सुरेख आराखडा तयार केला आणि १९८२ मध्ये मंदिराचे बांधकाम अवघ्या तीन लाख रुपयांत पूर्ण झाले. पूर्वी या मंदिरात फक्त महाकालीची मूर्ती होती. नंतर भाविकांच्या आग्रहास्तव महालक्ष्मी व सरस्वतीची मूर्ती स्थापन करण्यात आली. दरवर्षी नवरात्रीनिमित्त कालिका मातेचा उत्सव भक्तिभावाने व उत्साहात साजरा केला जातो. प्रत्येक वर्षी नवरात्रीत पहाटेच्या काकड आरतीपासून धार्मिक कार्यक्रमांना सुरुवात होते. या कालावधीत दररोज हजारो भाविकांची दर्शनासाठी उपस्थिती होती. भाविकांना दर्शन सुलभ व्हावे, या नियोजनासाठी विश्वस्त मंडळ नऊही दिवस अविरत कार्यरत होते. यात्रोत्सवात मिठाई, खेळणींच्या दुकानांची रेलचेल तसेच, भाविकांसह राजकीय, सामाजिक, प्रशासकीय क्षेत्रातील मान्यवरही येथे दर्शनासाठी व पूजा-आरतीसाठी आले. विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष केशव अण्णा पाटील यांच्या प्रयत्नांमुळे मंदिरालगत भक्तनिवास बांधण्यात आले आहे. त्यामुळे भाविकांची योग्य व्यवस्था झाली. याठिकाणी अल्पदरात भोजन व्यवस्था देखील असल्याने नवरात्रकाळात अनेकांनी त्याचा लाभ घेतला. कालिका माता नवसाला पावणारी देवी असल्याची भाविकांची श्रद्धा असल्याने केवळ नाशिक शहरातूनच नाही, जिल्हाभरातून नवस करण्यासाठी व इच्छा पूर्ण झाल्यानंतर तो फेडण्यासाठी मोठ्या संख्येने भाविक नवरात्रात येथे आले. तसेच वर्षभरही हजारो भाविक या ठिकाणी दर्शनाचा लाभ घेतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana 2026 : लाडक्या बहिणींच्या खात्यात पुढच्या आठवड्यात जमा होणार 1500 रुपये? दिवाळीपूर्वी दोन महिन्यांचे 3000 रुपये मिळणार? महत्त्वाची अपडेट समोर...

ए, माझं बोलणं नीट ऐक... टायगर श्रॉफवरील हल्ल्यानंतर बिश्नोई गँगची सलमान खानला उघड उघड धमकी; म्हणाले-

Latest Marathi News Live Update : सतेज पाटलांच्या आघाडीची महायुतीविरोधात कडवी झुंज, 8 उमेदवार आघाडीवर; 'महायुती'चा आकडा 14 वरून 12 पर्यंत घसरला..

SMRITI MANDHANA SHAIFALI VERMA RECORD: स्मृती-शफालीच्या जोडीने रचला इतिहास; टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारी पहिलीच जोडी

Pune News: पुणे मार्केट यार्डात रुग्णवाहिका वेळेत न पोहोचल्याचा आरोप; व्यक्तीचा मृत्यू, आपत्कालीन व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह

SCROLL FOR NEXT