(टुडे पान एकला ॲंकर)
-------------------
फोटो : NSK26H32771/ NSK26H32772
नंदुरबार : कन्यापूजन करताना यजमान. दुसऱ्या छायाचित्रात मान्यवराच्या सन्मानाप्रसंगी उपस्थित अविनाश महाराज जोशी, डॉ. हीना गावित, शिरीष चौधरी, भाग्यश्री चौधरी, माधवी पाटील, डॉ. राजेश वळवी, डॉ. त्र्यंबक पाटील, डॉ. गौरव तांबोळी, डॉ. मनोज तांबोळी, श्रावण चव्हाण, निलेश माळी, हिरालाल चौधरी, रवींद्र पवार, गौरव नरेंद्र चौधरी, भावना पटेल, संदीप पाटील, जगदीश गावित, आर. एन. पाटील.
-----------
वैदिक मंत्राच्या जयघोषात पार पडला कन्यापूजन सोहळा
३०९ कन्यांचे पूजन : हिंदु सेवा सहाय्य समितीचे आयोजन
सकाळ वृत्तसेवा
नंदुरबार, ता. १७ : नवरात्रीनिमित्त येथील हिंदु सेवा सहाय्य समिती आणि लताई आरोग्य धाम यांच्या संयुक्त विद्यमाने ३०९ कन्यांचे पूजन करण्यात आले. या वेळी कन्याभोजन देऊन कपडे, शालेय साहित्य मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले. या वेळी कन्यांच्या नेत्रात देवीभाव तर पूजकांच्या नेत्रात भावाश्रु दिसून आले. हिंदु सेवा सहाय्य समितीचे डॉ. नरेंद्र पाटील यांच्या संकल्पनेतून या नेत्रदिपक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. त्याचप्रमाणे यावेळी उत्कृष्ट नागरिक सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल पोलिस विभाग, विद्युत वितरण कंपनीला सन्मानपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.
श्री. गजानन महाराज मंदिर सभागृहात आयोजित या सोहळ्याची सुरूवात श्री दुर्गामातेचा महाआरतीने झाली. प्रमुख पाहुणे भागवतकार अविनाश महाराज जोशी, माजी खासदार डॉ. हीना गावित, माजी आमदार शिरीष चौधरी, तळोदा नगराध्यक्ष भाग्यश्री चौधरी, शहादा उपनगराध्यक्ष माधवी पाटील, डॉ. राजेश वळवी, डॉ. त्र्यंबक पाटील, डॉ. गौरव तांबोळी, डॉ. मनोज तांबोळी, अखिल भारतीय बंजारा क्रांती दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रावण चव्हाण, भाजपचे जिल्हाध्यक्ष निलेश माळी, नगरसेवक हिरालाल चौधरी, नगरसेवक रवींद्र पवार, नगरसेवक गौरव नरेंद्र चौधरी, नगरसेविका भावना पटेल, शहर पोलिस निरीक्षक संदीप पाटील, शहर वाहतूक शाखेचे प्रभारी अधिकारी जगदीश गावित, विद्युत वितरण कंपनीचे अभियंता आर. एन. पाटील उपस्थित होते.
डॉ. नरेंद्र पाटील यांनी सांगितले की, जगाच्या पाठीवर हिंदु धर्मच असा आहे की, जो महिलेला देवी रुपात पूजतो. या कन्यांचे नवरात्रीतच नाही तर प्रत्येक दिवशी सुरक्षारूपी पूजन करावे. वर्षभरात उत्कृष्ट नागरी सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल जिल्हा पोलिस दलातर्फे संदीप पाटील व कर्मचारी, शहर पोलिस दलातर्फे जगदीश गावित व विद्युत वितरण कंपनीतर्फे आर. एन. पाटील व कर्मचाऱ्यांचा गौरव करण्यात आला.
अविनाश महाराज जोशी म्हणाले, नारी ही शक्तीस्वरूप आहे. दररोज शक्तीची उपासना केली पाहिजे. माजी आमदार शिरीष चौधरी यांनी दरवर्षी कन्यापूजनासाठी श्री गजानन महाराज मंदिराचे सभागृह उपलब्ध करून देणार असल्याचे जाहीर केले. डॉ. हीना गावित यांनी सांगितले की, कन्यांमध्ये आदिशक्ती जगदंबेचे स्वरूप असते. हिंदु सेवा सहाय्य समितीमुळे सामूहिक कन्यापूजन करण्याचे पुण्य प्राप्त होत असते. या वेळी माधवी पाटील, संदीप पाटील, श्रावण चव्हाण यांनी मनोगत व्यक्त केले.
संघटनेची प्रार्थना जागृती पाटील हिने केली. वैदिक मंत्रघोष अविनाश महाराज जोशी, महाआरती प्रमोद जोशी महाराज यांनी केली. राजू चौधरी यांनी सूत्रसंचालन केले. ॲड. भारती कासार यांनी आभार मानले. महिषासुरमर्दिनी स्तोत्र म्हणत कन्यांवर पुष्पवृष्टी करून सोहळ्याची सांगता करण्यात आली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.