नाशिक

नवरात्र चिंतन – ६

CD
नवरात्र चिंतन – ६ -- फोटो : H32500 -- सुवर्णकांती अन् भव्य स्वरूप: कात्यायनी माता लीड नवरात्रीची सहावी माळ; आज सरस्वती आवाहनाचा दिवस आहे. भगवती दुर्गादेवीचे सहावे रूप कात्यायनी आहे. कात्यायनी देवीच्या संदर्भात काही कथा प्रचलित आहेत. पहिली कथा अशी की, कत नावाचे एक प्रसिद्ध महर्षी होते. त्यांचा पुत्र ऋषी कात्य होता. या कात्य गोत्रात विश्वप्रसिद्ध महर्षी कात्यायन ऋषी होऊन गेले. त्यांनी भगवती परमांबेची दीर्घकाळ उपासना केली आणि कठीण तपाचरण केले. भगवती मातेने कन्यारूपात आपल्या घरी जन्म घ्यावा, अशी त्यांची मनोकामना होती. त्यांच्या साधनेचा आणि प्रार्थनेचा स्वीकार करून भगवती त्यांच्या घरी जन्माला आली. - लक्ष्मीकांत जोशी, नाशिक -- दुसऱ्या एका कथेत महिषासुराचा संदर्भ येतो. महिषासुराचे अत्याचार पृथ्वीवर वाढले. तेव्हा भगवान ब्रह्मा, विष्णू आणि महेश या तिघांनी आपापले तेज एकत्र केले. त्यातून महिषासुराच्या वधासाठी देवीची निर्मिती झाली. या देवीची सर्वप्रथम पूजा महर्षी कात्यायन यांनी केली. त्यामुळे तिला ‘कात्यायनी’ असे नाव पडले. श्रीमद्भागवतामध्ये गोपींनी भगवान श्रीकृष्ण पतीरूपाने प्राप्त व्हावेत, यासाठी यमुना तीरावर कात्यायनी देवीची पूजा केल्याचा उल्लेख आहे. व्रजभूमीची अधिष्ठात्री देवी म्हणूनही कात्यायनीचा विचार केला जातो. कात्यायनी देवीचे स्वरूप अत्यंत भव्य आणि दिव्य आहे. ती सुवर्णाप्रमाणे प्रकाशमान आहे. तिला चार भुजा आहेत. उजव्या वरच्या हातात अभयमुद्रा, तर उजव्या खालच्या हातात वरमुद्रा आहे. डाव्या वरच्या हातात तलवार आणि डाव्या खालच्या हातात कमळपुष्प आहे. सिंह हे भगवतीचे वाहन आहे. भगवतीच्या कृपेने साधकाला चारही पुरुषार्थ प्राप्त होतात. रोग, शोक, संताप आणि भय यांचा नाश होतो. जन्मजन्मांतरीची पापे भगवती कात्यायनीच्या कृपेने नष्ट होतात. आज साधकाचे मन आज्ञाचक्रात स्थिर होते. कुंडलिनी जागृतीमध्ये आज्ञाचक्राला विशेष स्थान आहे. सर्वार्थाने भगवती कात्यायनीला शरण जाऊन तिचे स्तवन करताना आपण म्हणूया, चन्द्रहासोज्ज्वलकरा शार्दूलवरवाहना। कात्यायनी शुभं दद्याद् देवी दानवघातिनी॥

FDA Strict Action : मसाल्यांमध्ये कृत्रिम रंग अन् भेसळीला पूर्ण बंदी! आयुक्त तुकाराम मुंढेंकडून कडक नियमावली जारी; नियम मोडल्यास थेट कारवाई

Neha Bora: 'सीजेपी'च्या पत्रकार परिषदेत गोंधळ अन् घोषणाबाजी; आंदोलनाची पुढची दिशा केली स्पष्ट

Latest Marathi News Update: लैंगिक शोषणप्रकरणी कोऱ्हाळे खुर्द येथील तरुणावर गुन्हा

Medical Courses : वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या तिसऱ्या फेरीतील प्रवेशासाठी शुक्रवारपर्यंत मुदतवाढ

नाना पाटेकरांनी सिंहगडाच्या पायथ्याशीच फार्महाऊस का बांधलं? पुरुषोत्तम बेर्डेंनी सांगितलं कारण, म्हणालेले- इथून महाराजांचे...

SCROLL FOR NEXT