नाशिक

असलोद - सप्तशृंगीगड पदयात्रेचे प्रस्थान

CD
33043 प्रकाशा : तापी, गोमती, पुलिंदा या पवित्र जलाने कावड भरताना वारकरी. असलोद - सप्तशृंगीगड पदयात्रेचे प्रस्थान ‘अंबे माता कि जय, दुर्गा माता कि जय’ चा जयघोष सकाळ वृत्तसेवा वडाळी ता. २२ : असलोद ते सप्तशृंगीगड कावड दिंडी पदयात्रेचे प्रस्थान झाले असून प्रकाशा (ता. शहादा ) येथील तापी, गोमती, पुलिंदा त्रिवेणी संगमावरुन जलाभिषेक केल्यानंतर संगमाच्या पवित्र पाण्याने कावड भरून ‘अंबे माता कि जय, दुर्गा माता कि जय’ चा जयघोषण करीत कावडधारकांची पदयात्रा पुढील प्रवासासाठी मार्गस्थ झाली. यावेळी जयघोषाने परिसर दुमदुमून गेला होता. कावड दिंडी पदयात्रेची सुरुवात १९६७ ला नवरात्रच्या पावन काळात ब्रम्हलीन मधुसुधन पाठक उर्फ नाना बाबा यांनी सात वारकऱ्यांना घेऊन सुरु केली. वारीतील अखंड नामघोष, शिस्तीचे पालन, अध्यात्मिक परिवर्तन, नाथ पंथाचे आचरण, सेवाभाववृती अशा मौलिक गुणांमुळे गेल्या साठ वर्षात यात १० ते १५ हजार वारकरी सहभागी झाले. कावड पदयात्रेचे हे साठावे वर्षे आहे. खानदेशांतील सर्वात जुनी व भव्य कावड यात्रा म्हणून नाव लौकिक होत आहे. भक्ती आणि शिस्तीचे दर्शन घडविणाऱ्या या पदयात्रेत गुजरात, मध्यप्रदेश यासह महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांचे भाविकही सहभागी होतात. हजारोच्या संख्येने संचलन करत वारकरी कोजागिरी पौर्णिमेला सप्तशृंगी गडावर देवीचा जलाभिषेक करतात. नवस फेडतात. सध्या या वारीचे नेतृत्व नाना बाबा यांचे वारसदार भटु पाठक करित आहेत. त्याच्यासोबत, धर्मा शिंदे, दिलीप राजभोज, उद्धव पाटील, कैलास पाटील यांचे सहयोग लाभत आहे. यातील कवी धर्मा शिंदे हे दरवर्षो देवी महात्म्यावर स्वयंरचित काव्य रचतात. तेच काव्य प्रत्येक मुक्कामाच्या ठिकाणी गायन केले जाते. तसेच भजन, भारुडच्या माध्यमातून समाज प्रबोधन केले जाते. पदयात्रेचा मार्ग प्रकाशा, शहादा, असलोद, चिरखान, सारंगखेडा, दोडाईचा, इंदवे, दुसाणे, साक्री, दिघावे, ताहराबाद, विरगांव, बेज, आठंबे, नांदुरी, सप्तशृंगीगड असा असतो. सध्या ही कावडधारी पदयात्रा नाशिक जिल्ह्यात सीमेवर पोहचली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Suresh Dhas : "अण्णा, आमच्या लग्नाचं बघा; नोकरी लागेपर्यंत मानधन द्या!"; महायुतीच्या प्रचारसभेत पदवीधर तरुणाची आमदार सुरेश धसांकडे भावनिक साद..!

IND vs NZ 1st T20I : २७ धावांत ४ विकेट्स... संजू सॅमसनचे वादळ दुर्दैविरित्या थांबले अन् टीम इंडियाच्या गटांगळ्या; तिलक, इशान यांनी विश्वास तोडला... Video

Latest Marathi News Live Update : हुती बंडखोरांचा सौदीतील दम्माम विमानतळावर हल्ला; एका भारतीय नागरिकाचा मृत्यू

Viral Video: आईच्या कुशीत मस्ती करणारे वाघाचे बछडे; ताडोबाच्या जंगलातील मायेचा सुंदर क्षण कॅमेऱ्यात कैद

Thyroid Diet Tips: थायरॉईडच्या रुग्णांनी खाण्यापूर्वी विचार करा! 'या' पदार्थांबाबत डॉक्टर काय सांगतात?

SCROLL FOR NEXT