महापालिकेच्या कामांची पाहणी करताना आयुक्त. Sakal
नाशिक

बांधकामाच्या गुणवत्तेवर लक्ष ठेवा : आयुक्त पवार

कामांची चार तास पाहणी

सकाळ वृत्तसेवा

नाशिक - महापालिका आयुक्त रमेश पवार यांनी गुरुवारी (ता. १४) पूर्व, पश्चिम व पंचवटी विभागात सुरू असलेल्या तसेच कार्यारंभ आदेश देणे बाकी असलेल्या कामांची पाहणी केली. त्यात कामाच्या गुणवत्तेवर लक्ष ठेवण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले. बांधकाम विभागातर्फे शहरातील विविध भागात सुरू असलेल्या विकासकामांची पाहणी गुरुवारी सकाळी साडेसातला केली. साधारण चार तासांच्या पाहणी दौऱ्यात श्री. पवार यांनी पूर्व, पश्चिम व पंचवटी विभागात सुरू असलेल्या कामांची गुणवत्ता राखली जाऊन वेळेत व गतीने कामे पूर्ण होण्याच्या दृष्टीने गती देण्याचे निर्देश शहर अभियंता नितीन वंजारी व बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले.

आयुक्त पवार यांनी नाशिक पूर्व विभागातील मुंबई नाका ते हॉटेल छान जवळील शिवाजीवाडी घरकुल योजनेचा ३० मीटर डीपी रस्ता, इंदिरानगर बोगदा ते साईनाथ नगर चौफुली, वडाळा चौफुली ते एचपी गॅस गोडाऊन रविशंकर मार्गापर्यंत, सावता माळी मार्ग, एचपी गॅस गोडाऊन जंक्शनपासून रविशंकर मार्गाने के. के. वाघ इंग्लिश स्कूल जवळील प्रस्तावित क्रीडा संकुल कामाची पाहणी करण्यात आली. सावता माळी मार्ग ते नाशिक- पुणे महामार्गांपर्यंत प्रस्तावित कामांची पाहणी केली. पोतदार शाळेपासून उजव्या बाजूने प्रस्तावित काँक्रिट रोडची पाहणी केली. पश्चिम विभागातील बाळासाहेब ठाकरे इतिहास संग्रहालय येथे उद्यान रिक्रिएशन सेंटर विकसित करणे, विसे चौक ते कुसुमाग्रज स्मारक रस्ता अस्तरीकरण करणे, कुसुमाग्रज स्मारक ते गंगापूर नाका गांगुर्डे हॉस्पिटल दरम्यानचा रस्ता खडीकरण करणे, चोपडा लॉन्स ते डॉ. केकाण हॉस्पिटल (जोशीवाडा) रस्ता अस्तरीकरण करणे, घारपुरे घाट गोदावरी नगर येथे बोट क्लब बांधणे, पंचवटी विभागातील नाट्यगृह इमारत व त्यालगतचा रस्ता काँक्रिटीकरण करणे, गुंजाळ बाबानगर पुलाचे रुंदीकरण करणे यासह प्रभाग ६ मधील कामांची पाहणी करण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lung cancer in Mumbai : मुंबईत फुफ्फुसांच्या कर्करोगाच्या ५७ टक्के रुग्णांमध्ये प्रदूषण हेच प्रमुख कारण!

SL vs NZ, T20 WC: न्यूझीलंडची उपांत्य फेरीच्या दिशेने वाटचाल! श्रीलंकेचे आव्हान संपुष्टात, जाता जाता पाकिस्तानची लावली वाट

Bride shot at wedding ceremony Video : विवाहमंडपात थरार! नववधूवर माथेफिरू प्रियकरानं सर्वांसमोरच झाडली गोळी

Amravati Crime : अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार; पीडितेला दारू पाजल्याचाही आरोप, दोघांना अटक

Udgir Gutkha Seized : पाठलाग करून साडेदहा लाखांचा गुटखा पकडला; एक चारचाकी तर एक आरोपी ताब्यात

SCROLL FOR NEXT