नाशिक

मंडपासाठी निधीची मागणी

CD
धुळे : टुडे पान ४ साठी.. -- फोटो क्रमांक : 32907 कमखेडे (ता. शिंदखेडा) : श्री कोळंबा देवीचे मंदिर. -- कोळंबा देवी सभा मंडपासाठी निधीची मागणी -- कमखेडा ते मंदिर रस्त्यासाठी पालकमंत्री रावलांकडे निवेदन सकाळ वृत्तसेवा धुळे, ता. १८ : कमखेडे (ता. शिंदखेडा) येथील प्रसिद्ध श्री कोळंबा देवीच्या मंदिराचा सभा मंडप उभारणे आणि कमखेडा ते मंदिर ६०० फूट अंतराच्या रस्त्याचे काँक्रिटीकरण करण्यासाठी शासनाकडून निधी मिळावा, अशी मागणी श्री कोळंबा देवी सेवा समितीतर्फे करण्यात आली आहे. या संदर्भात पणन व राजशिष्टाचार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांना सेवा समितीतर्फे निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली. - कमखेडे गावाजवळ तापी नदीच्या काठी सर्वे क्रमांक ५१९ मध्ये एका समडीच्या झाडाखाली सुमारे ४०० वर्षांपासून कोळंबा देवीचे स्थान आहे. हे मंदिर महाले व आखडमल कुलधारीत परिवाराची कुलस्वामिनी आहे. नवरात्री व चैत्र शुद्ध चतुर्दशीला नवस फेडण्यासाठी येथे भाविक मोठ्या संख्येने येतात. भाविकांची गैरसोय टळावी म्हणून २०१८ मध्ये ‘श्री कोळंबा देवी सेवा समिती, कमखेडा’ या संस्थेची स्थापना करण्यात आली. समितीचे अध्यक्ष मधुकर शामराव महाले (रा. हुंबर्डे, ता. शिंदखेडा) व अकरा विश्वस्तांनी पुढाकार घेत मंदिराचा जीर्णोद्धार केला. १०० बाय ८० फूट क्षेत्रफळात निंब, आंबा, चिंच, बेल, पिंपळ, वड व फुलझाडांचे वृक्षारोपण करून तारेचे कंपाऊंड, बोअरवेल आणि ६०० फुटांचा कच्चा रस्ता तयार केला. सध्या मंदिराच्या आवारात भाविकांना ऊन व पावसाचा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे येथे सभा मंडप बांधणे आणि कमखेडा ते मंदिरापर्यंतच्या ६०० फूट कच्च्या रस्त्याचे काँक्रिटीकरण करणे आवश्यक आहे. या विकासकामांसाठी शासनाने निधी मंजूर करावा, अशी मागणी अध्यक्ष महाले व विश्वस्त मंडळाने निवेदनाद्वारे केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

आम्ही घाबरणार नाही, माघारही घेणार नाही! अभिजित दिपकेंनी सांगितला पुढचा प्लॅन, नेमकं काय म्हणाले?

Satara Farmer Loan Waiver: साताऱ्यात ७,७८९ शेतकरी कर्जमाफीपासून वंचित; कर्जमाफी होऊनही पात्रतेचा खोडा, धक्कादायक कराण आल समाेर!

सासऱ्यांनी सांगितलं एका वर्षाचा आत वजन घटव... कविता मेढेकर यांचा खुलासा, म्हणाल्या, 'माझे सासू-सासरे...'

Spinal Pain: पाठीच्या कण्याच्या आरोग्यासाठी कोणत्या कुशीवर झोपणे योग्य? पाठ टेकून झोपण्याचेही आहेत फायदे!

2026 च्या शेवटच्या 3 महिन्यांची बाबा वेंगांची भविष्य वाणी व्हायरल; ‘या’ राशींबाबत चर्चांना उधाण!

SCROLL FOR NEXT