नाशिक

सातवी माळ अन सुट्टीच्या पर्वणीवर दीड लाखांवर भाविक जगदंबा चरणी लिन..! दोन दिवसांत कोटमगाव भाविकांच्या गर्दीने फुलले,कोट्यवधीची उलाढाल

CD
पान तीन ------------- 27229, 27225 कोटमगाव: जगदंबा मातेची मूर्ती. दुसऱ्या छायाचित्रात दर्शनासाठी मंदिरात भाविकांची झालेली गर्दी. दीड लाखांवर भाविक जगदंबा चरणी लीन सातव्या माळेला कोटमगाव भाविकांच्या गर्दीने फुलले सकाळ वृत्तसेवा येवला, ता. १८ : दुष्काळाच्या सावटाखाली कोटमगाव येथील जगदंबा मातेची यात्रा शनिवारची सातवी माळ व रविवारची सुट्टी अशा लागोपाठ आलेल्या सुट्टीमुळे सुमारे लाखांवर भाविकांनी दर्शनासह यात्रेचा आनंद लुटला. शनिवारी सकाळी आठपासून सुरू झालेला गर्दीचा महापूर रात्री उशिरापर्यंत सुरूच होता. दरम्यान, देवीच्या मंदिरास परिसरातील आकर्षक रोषणाई,यात्रेत असलेले पाळणे, रहाट गाडगे व त्यावरील रोषणाईने यात्रेला आगळे वेगळे रूप आले होते. भाविकांच्या गर्दीने खरेदी-विक्रीचा व्यवसायिकांना मोठा आधार मिळाला आहे. कोटमगाव येथील नवसाला पावणाऱ्या श्री महाकाली, श्री महालक्ष्मी व श्री महासरस्वती या तीन देवींचे एकरूप जगदंबा मातेच्या दर्शनासाठी भाविकांची नवरात्रात नऊही दिवस रेलचेल असते.नवरात्रोत्सवात येथे भव्य यात्रा भरली असून नाशिकसह, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, धुळे आदी जिल्ह्यातून लाखो भाविक येथे दर्शनाला येत आहेत. सातव्या माळेला हाच आकडा ४० ते ५० हजारांवर गेला किंबहुना रात्री एक वाजेपर्यंत भाविकांची गर्दी होती. रविवारच्या सुट्टीमुळे ५० ते ६० हजारांवर पोहोचला होता. देवीच्या दर्शनासाठी प्रत्येक माळेगणिक भाविकांची गर्दी वाढत आहे.भक्तांमुळे कोटमगाव अक्षरशः फुलून गेले आहे. विशेषत : आज रविवारच्या सुट्टीमुळे ग्रामीण भागातील भाविकांनी देवीच्या दर्शनाची पर्वणी साधली. दररोज पहाटे येवला शहर व आजूबाजूच्या गावातून हजारो भाविक पायी कोटमगाव येथे दर्शनासाठी जात असून सायंकाळी देखील सातनंतर अकरापर्यंत शहरातील भाविकांची गर्दी असल्याने हा रस्ता फुल्ल होऊन वाहत आहे. दररोज सायंकाळी नऊ वाजता अतिथींच्या हस्ते देवीची आरती केली जात असून मंदिरासमोरील प्रांगणात घटी बसलेल्या भाविकांसाठी दररोज विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे. ---------- कोटमगाव उजळले मंदिरावर केलेली सुंदर रोषणाई तसेच राहट पाळणे व इतर खेळण्यावरही प्रकाशदिवे उजळले असून विविध हॉटेल, दुकानांमध्येही रोषणाई केली असल्याने रात्रीच्या वेळेस हा संपूर्ण परिसर प्रकाशमय झालेला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gokul Milk Union Election 2026 : गोकुळच्या मतदान केंद्रावर सुरक्षा व्यवस्थेचे तीनतेरा; मतपत्रीकेचे फोटो व्हायरल, नजर चुकवून मोबाईलवर काढले फोटो

Latest Marathi News Live Update : नारायण आबा पाटील, उत्तमराव जानकर आणि बाबासाहेब देशमुख महायुतीच्या पाठिशी? जयकुमार गोरेंचा दावा

आम्ही घाबरणार नाही, माघारही घेणार नाही! अभिजित दिपकेंनी सांगितला पुढचा प्लॅन, नेमकं काय म्हणाले?

Satara Farmer Loan Waiver: साताऱ्यात ७,७८९ शेतकरी कर्जमाफीपासून वंचित; कर्जमाफी होऊनही पात्रतेचा खोडा, धक्कादायक कराण आल समाेर!

सासऱ्यांनी सांगितलं एका वर्षाचा आत वजन घटव... कविता मेढेकर यांचा खुलासा, म्हणाल्या, 'माझे सासू-सासरे...'

SCROLL FOR NEXT