Image of Lalbaghcha Raja ganesh idol depicted on ten rupee coins. esakal
नाशिक

Nashik : 10 रुपयांच्‍या नाण्यांवर साकारला लालबागचा राजा

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : अवघ्या काही दिवसांवर गणेशोत्‍सव येऊन ठेपला असून, सर्वत्र उत्‍साहाचे वातावरण बघायला मिळतेय. उत्‍सवानिमित्त भाविकांकडून बाप्पाप्रति विविध पद्धतीने प्रेमभाव व्‍यक्‍त केला जातोय. युवा कलाकार वैष्णवी कानोजे हिनेदेखील आपल्‍या कल्‍पकतेतून बाप्पाचे अनोखे रुप साकारले आहे. तिने चक्‍क दहा रुपयांच्‍या नाण्यांवर लालबागच्‍या राजाचे मनमोहक रुप साकारले आहे. (Lalbaugcha Raja ganesh idol painted on Rs 10 coin by young artist vaishnavi kanoje nashik news)

मुळची यवतमाळ येथील वैष्णवी विनोद कानोजे हिने कला क्षेत्रातील शिक्षण मुंबई आणि नाशिक येथून झाले. आपल्‍यातील कलेच्‍या माध्यमातून बाप्पांप्रती भक्तिभाव व्‍यक्‍त करण्यासाठी तिने चक्‍क दहा रुपयांच्‍या नाण्यांवर लालबागच्‍या राजाचे चित्र रेखाटलेले आहे.

नाण्याचा आकार एक इंच असून, वैष्णवीला बाप्पांचे चित्र साकारण्यात अवघे ४८ मिनीट लागले. वेगवेगळ्या रंगसंगतीचा वापर करताना तिने लालबागच्‍या राजाची प्रतिकृती या दहा रुपयांच्‍या नाण्यांवर साकारली आहे.

"नाण्यांवर बाप्पाचे रुप साकारण्याची संकल्‍पना सुचली. दहा रुपयांच्‍या नाण्यांवर अवघ्या ४८ मिनिटांमध्ये लालबागच्‍या राजाचे रुप साकारले. कलेच्‍या माध्यमातून गणेशोत्‍सवात गणपती बाप्पांप्रती भक्तिभाव व्‍यक्‍त करण्याचा हा प्रयत्‍न केला." -वैष्णवी कानोजे, युवा कलावंत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asian Games, Archery: भारताच्या लेकींचा सुवर्णवेध! चीनचा धुव्वा अन् थेट वर्ल्ड रेकॉर्ड करत जिंकलं भारतासाठी सातवं गोल्ड मेडल

Pradeep Purnekar Murder : प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात दोन संशयित ताब्यात, चौघांचा शोध सुरु; कुटुंबीयांचे शिंदे सेनेच्या नेत्यावर गंभीर आरोप

प्रज्ञाविकासाचा राजमार्ग : उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती : इन्स्पायर-एसएचई

Latest Marathi News Live Update : मुंबईतील १४ फुटांवरील झोपड्यांवरील कारवाईला राष्ट्रवादीचा विरोध

IND vs WI, 2nd ODI: नितीश रेड्डीचा प्रयोग फसला, नबीचं होणार पदार्पण? भारताला मालिका खिशात घालण्याची संधी, कुठे पाहाणार सामना?

SCROLL FOR NEXT