NMC News  esakal
नाशिक

NMC News: सार्वजनिक गणेश मंडळांना परवाना शुल्क माफ! महापालिका घेणार अंतिम निर्णय

सकाळ वृत्तसेवा

NMC News : सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करताना नवीन नियमावलीनुसार गणेश मंडळांना महापालिकेकडे परवाना शुल्क अदा करणे बंधनकारक आहे.

परंतु, विविध मंडळांच्या मागणीनुसार महापालिकेकडून परवाना शुल्क माफ करण्याची तयारी करण्यात आली आहे.

मंडळांकडून आकारले जाणारे साडेसातशे रुपये परवाना शुल्क माफ केले जाणार आहे. त्यासंदर्भातील प्रस्ताव महासभेवर सादर करण्यात आला आहे. (License fee waived for public Ganesh Mandals NMC will take final decision nashik)

शहरात गणेशोत्सव साजरा करण्यासाठी मंडळांना आरास, मंडप धोरणाची अंमलबजावणी करण्यासंदर्भात माहिती देण्यासाठी २५ ऑगस्टला बैठक झाली.

बैठकीत मंडळाचे पदाधिकारी, स्थानिक लोकप्रतिनिधींना परवानगी देताना आकारले जाणारे परवाना शुल्क माफ करण्याची मागणी केली होती. २०२२ मध्ये नाममात्र शुल्क माफ केले होते. त्याअनुषंगाने प्रशासनाने अभ्यास करून प्रस्ताव सादर केला आहे.

रस्त्यावर तात्पुरत्या स्वरूपात मंडप, स्टेज, कमान उभारण्यासाठी दररोज सहा रुपये प्रतिचौरस मीटर किंवा कमीत- कमी ७५ रुपये दराप्रमाणे शुल्क आकारले जाते.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

महापालिकेच्या मालकीच्या जागेमध्ये सार्वजनिक गणेशोत्सवकरिता एकूण दहा दिवसांकरिता नाममात्र ७५० व त्यावरील वस्तू व सेवाकर १८ टक्के याप्रमाणे शुल्क आकारणी करून विभागीय कार्यालयामार्फत परवानगी दिली जाते.

मात्र महापालिकेच्या मालकीच्या जागांव्यतिरिक्त खासगी जागांमध्ये मंडप, स्टेज उभारणी केल्यास, त्यावर शुल्क आकारली जात नाही. परंतु नियमाप्रमाणे इतर आनुषंगिक परवानगी प्राप्त करणे क्रमप्राप्त आहे.

त्यामुळे आगामी सार्वजनिक गणेशोत्सव करिता लोकप्रतिनिधींच्या मागणीचा विचार करून महापालिकेच्या जागांवर, रस्त्यावर, मंडप किंवास्टेज व कमानीकरिता आकारण्यात येणारे नाममात्र साडेसातशे रुपये शुल्क एक वर्षाकरिता माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अंतिम निर्णय महासभा घेणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT