कर्जमुक्ती योजनेच्या चौथ्या यादीत
४२३ शेतकऱ्यांचा समावेश
नंदुरबार, ता. २३ : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेची जिल्ह्यातील ४२३ पात्र शेतकऱ्यांची चौथी यादी गुरुवारी (ता. २२) प्रसिद्ध झाली. संबंधित शेतकऱ्यांनी नजीकच्या सेवा केंद्रावर जाऊन आधार प्रमाणीकरणाची प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक एस. वाय. पुरी यांनी केले आहे.
कर्जमुक्ती योजनेची अंमलबजावणी ऑनलाइन संगणकीय प्रणालीद्वारे करण्यात येत आहे. यासाठी शासनाने महाआयटीची नियुक्ती केली आहे. बँकांनी योजनेच्या पोर्टलवर एकूण २८ हजार ४२६ थकीत कर्ज खात्यांची माहिती अपलोड केली आहे. महाआयटीने संगणकीय प्रक्रियेद्वारे २१ हजार १३६ शेतकऱ्यांची यादी प्रसिद्ध केली आहे. त्यापैकी आधार प्रमाणिकरण १४ हजार ८६८ पात्र लाभार्थ्यांचे आधार प्रमाणीकरण झाले असून, उर्वरित सहा हजार २६८ पात्र शेतकऱ्यांनी आपले आधार प्रमाणिकरण पूर्ण करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
योजनेतील पात्र शेतकऱ्यांची कर्ज बाकी ३१ मार्च २०२६ रोजीच्या स्थितीनुसार निश्चित केली असून, १ एप्रिलनंतरचे व्याज व इतर खर्च माफ होणार आहेत. राष्ट्रीयीकृत व व्यापारी बँकांमधील काही शेतकऱ्यांची ३१ मार्च कर्जथकबाकी दोन लाख रुपयांपेक्षा अधिक असली,
तरी शासनाच्या धोरणानुसार संबंधित कर्ज निरंक करण्यात येणार आहे. मृत, वयोवृद्ध तसेच बोटांचे ठसे नोंदविण्यात अडचण येणाऱ्या पात्र लाभार्थ्यांनाही योजनेचा लाभ मिळावा, यासाठी मानक कार्यप्रणाली (एसओपी) निर्गमित केली असून, आधार प्रमाणीकरण पूर्ण झाल्यानंतरच कर्जमुक्तीची रक्कम संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे. लाभार्थी शेतकऱ्यांच्या याद्या संबंधित बँक शाखा, विविध कार्यकारी सहकारी संस्था आणि ग्रामपंचायतींत प्रसिद्ध करण्यात आली असून, पात्र शेतकऱ्यांनी आपले नाव यादीत तपासून प्रक्रिया पूर्ण करावी व योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी तसेच जिल्हा उपनिबंधक एस. वाय. पुरी यांनी केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.