फोटो : H32659
नाशिक : देवीची काढलेली पालखी.
महालक्ष्मी- टेंबलाई माता भेट
जपली जातेय शेकडो वर्षांची परंपरा
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. १६ : नवरात्रोत्सवात विविध धार्मिक परंपरांना विशेष महत्त्व असते. याच परंपरांपैकी महालक्ष्मी देवीने आपली मोठी बहिण टेंबलाई (त्रंबोली) देवीची भेट घेण्याची ऐतिहासिक परंपरा कोल्हापूर नंतर नाशिकमध्ये मोठ्या श्रद्धेने आणि भक्तिभावात पार पडली. पालखी सोहळा, ढोलताश्यांचा गजर, आरती आणि पारंपरिक धार्मिक विधींमुळे मंदिर परिसर भक्तिमय वातावरणाने भारावून गेला.
आख्यायिकेनुसार, प्राचीन काळी कोल्हासुर नावाच्या राक्षसाचा वधाप्रसंगी टेंबलाई देवीने प्रचंड मदत केली. मात्र विजयाचा उत्सव साजरा करताना महालक्ष्मी देवी टेंबलाई देवीला आमंत्रित करण्यास विसरली. त्यामुळे रुसून टेंबलाई देवी डोंगरावर जाऊन राहिली. तेव्हापासून महालक्ष्मी देवी दरवर्षी आपल्या बहिणीचा रुसवा काढण्यासाठी तिच्या दर्शनाला जाते, अशी श्रद्धा आहे. याच आख्यायिकेच्या स्मरणार्थ नवरात्रीमध्ये ही परंपरा पाळली जाते. गेल्या बारा वर्षांपासून हा धार्मिक सोहळा उत्साहात साजरा केला जात आहे. यंदाही महालक्ष्मी देवीचे प्रतिनिधी म्हणून मनोज शिवाजी बागूल यांच्या कुटुंबीयांनी टेंबलाई माता मंदिरात उपस्थित राहून महालक्ष्मी आणि टेंबलाई मातेची पारंपरिक भेट घडवून आणली. महालक्ष्मी देवीला पालखीत विराजमान करून ढोल-ताशांच्या गजरात मंदिरात आणण्यात आले. यावेळी देवीची आरती करण्यात आली. तसेच पारंपरिक धार्मिक विधीनुसार कोहळा कापून उत्सवाचा सन्मान करण्यात आला. सर्व धार्मिक विधी भक्तिभावात पार पडले. त्यानंतर मंदिर व्यवस्थापन समितीच्या वतीने उपस्थित पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला. सोहळ्यास टेंबलाई माता मंदिराचे प्रमुख रामसिंग बावरी, छाया बावरी, सुरेश पवार, मंगला पवार, प्रसाद बावरी, विजय पवार, किरण पवार, रवी पवार, बागूल परिवारासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.