नाशिक

जळगाव जिल्हा बँक निवडणूक पत्रकार परिषद जिल्हा बँक निवडणुकीसाठी महाविकास आघाडीची मोट बांधणी

CD
महाविकास आघाडीकडून मोटबांधणी सुरू -------- जिल्हा बँक निवडणुकीबाबत चार पक्षाच्या नेत्यांची पत्रकार परिषद सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता.२५ : येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीने एकत्रितपणे निवडणुकीला सामोरे जाण्याची भूमिका घेतली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्ष, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष, काँग्रेस व शेतकरी संघटना या चार घटकांनी एकत्र येत निवडणुकीच्या रणनीतीबाबत भूमिका मांडली. इच्छुक उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल करावेत. अर्जांची छाननी झाल्यानंतर सर्व उमेदवारांशी चर्चा करून पॅनेल निश्चित करण्यात येईल, अशी माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली. येथील पद्मालय या शासकीय विश्रामगृहात रविवारी (ता.२५) झालेल्या या पत्रकार परिषदेला चारही पक्षांचे जिल्हाध्यक्ष, शहराध्यक्ष व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. यात प्रमोद पाटील, गुलाबराव वाघ, भूषण पाटील, एजाज मलिक, अशोक लाडवांजरी, योगीराज पाटील, अन्वर खाटीक आदींचा समावेश होता. ...... इच्छुकांना अर्ज भरण्याचे आवाहन जिल्हा बँकेच्या निवडणुकीत सर्व समविचारी पक्ष व सहकार क्षेत्रातील कार्यकर्त्यांना सोबत घेण्याचा प्रयत्न असल्याचे यावेळी सांगण्यात आले. आघाडीबाहेरील काही इच्छुक उमेदवारांनीही संपर्क साधला आहे. त्यामुळे उमेदवारी अर्ज दाखल झाल्यानंतर व अर्जांच्या छाननीची प्रक्रिया पूर्ण झाल्यावर संबंधित उमेदवारांशी चर्चा करून पुढील रणनीती ठरविण्यात येणार आहे. सर्व उमेदवारांना विश्वासात घेऊन एकत्रित पॅनेल उभे करण्याच्यादृष्टीने प्रयत्न केले जाणार असल्याचे पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. ....... शेतकरीहिताला प्राधान्य जिल्हा बँक ही शेतकऱ्यांच्या आर्थिक व्यवहाराच्यादृष्टीने महत्त्वाची संस्था आहे. त्यामुळे बँकेचा कारभार शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य देणारा असावा, अशी भूमिका पत्रकार परिषदेत मांडण्यात आली. शेतकऱ्यांची बँक शेतकऱ्यांसाठीच चालली पाहिजे, या भूमिकेतून निवडणुकीत एकत्रितपणे लढा देण्याचे आवाहन करण्यात आले. चारही पक्षांनी एकत्र येत निवडणुकीची तयारी सुरू केल्याने जिल्हा बँकेच्या निवडणुकीतील राजकीय समीकरणांकडे सहकार क्षेत्राचे लक्ष लागले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IMD Weather Alert : चक्रीवादळाने रौद्ररूप धरले! ताशी १०० किमी वेगाने सुटणार सोसाट्याचा वारा; 'या' राज्यांत मुसळधार पाऊस, महाराष्ट्रात काय घडणार?

फ्लिपकार्टच्या गोदामातून ९८० सॅमसंग मोबाईल चोरीला; पुरावा मिळू नये म्हणून CCTV चा डीव्हीआरही पळवला...

Jamgaon News: रविवारी सुट्टी असतानाही सीईओंची जामगावला भेट; अपघातात मृत सेविकेच्या कुटुंबीयांचे सांत्वन

IND W VS ZIM W 2ND ODI NEWS: हरमनप्रीत दीप्तीची शतके, वैष्णवीची गोलंदाजीत कमाल! झिम्बाब्वेला लोळवत भारताने मालिका खिशात घातली

Dutch Farmers: डच ट्रॅक्टर रस्त्यावर, मागणी संसदेच्या टेबलावर; नायट्रोजन संघर्षाची सात वर्षे; २०३५चे लक्ष्य ठरले, पण डच शेतकऱ्यांना हवी आहे स्पष्टता

SCROLL FOR NEXT