मालेगाव सुपारी घोटाळा
प्रकरणी अधिकाऱ्यांचे निलंबन?
सकाळ वृतसेवा
नाशिक, ता. १५ : अन्न व औषध प्रशासन विभागाने (एफडीए) मालेगाव सुपारी घोटाळा प्रकरणी पाच अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केल्याचे समजते. मात्र, याबाबत कोणतेही आदेश नाशिक विभागास प्राप्त झाले नसल्याचे समजते.
मालेगाव येथे ११ फेब्रुवारी २०२४ ला ‘एफडीए’च्या गुप्त वार्ता विभागाने मालेगावला ११ ट्रक सुपारीचा साठा जप्त केला होता. या सुपारीचे बाजार मूल्य अंदाजे कोटी रुपये होते. अन्न विश्लेषकांच्या अहवालानंतर ही सुपारी खाण्यास अयोग्य असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे ही सुपारी ५ मार्च २०२५ ला नष्ट करण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते. मात्र, एकाच दिवसात ११ ट्रकमधून २५२ टन सुपारी नष्ट करणे अशक्य आहे. हा साठा कागदोपत्री नष्ट केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. हा साठा नष्ट करताना महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची कोणतीही परवानगी घेण्यात आली नव्हती, तसेच यासाठी झालेला लाखो रुपयांचा खर्च स्वतः करूनही त्याची कोणतीही देयके कार्यालयात सादर करण्यात आलेली नाही, असेही समितीच्या चौकशीत समोर आले आहे.
तत्कालीन सहायक आयुक्तांनी संबंधित अधिकाऱ्यांकडे लेखी पत्राद्वारे सुपारीबाबत विचारणा केली, पण त्या अधिकाऱ्यांनी कोणतीही माहिती दिली नाही. यामुळे त्या संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.