फोटो - १६१३३
मालेगाव : दसरा मैदान भागातील रस्त्यावरचे अतिक्रमण जेसीबीने काढताना
दसरा मैदानाच्या रस्त्यावरील
अतिक्रमण प्रशासनाने हटविले
सकाळ वृत्तसेवा
मालेगाव, ता. २० : येथील संगमेश्वर भागातील दसरा मैदानाच्या रस्त्यावरील अतिक्रमण प्रशासनाने हटविले. सार्वजनिक नागरी सुविधा समितीचे अध्यक्ष रामदास बोरसे यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी यासाठी आंदोलनाचा इशारा दिला होता. रस्त्यावरचे अतिक्रमण हटविण्यात आले असले तरी या भागातील जमिनीवरील इतर अतिक्रमण हटविण्याची मागणी करण्यात आली आहे.
अतिक्रमण न हटविल्यास महापालिकेत रावणदहन करण्याचा इशारा पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाला दिला होता. त्यानंतर प्रशासनाने कारवाई करीत अतिक्रमण हटविले. संगमेश्वर भागातील दसरा मैदानावर रावण दहन केले जाते. मात्र, या मैदानालगतच्या जागेवर संबंधित व्यक्तीने भिंत बांधून अतिक्रमण केले होते. त्यामुळे रावण दहनाच्या कार्यक्रमासाठी येणाऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागत होता. सदर अतिक्रमण हटविण्यासाठी रामदास बोरसे यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकाऱ्यांनी दसरा मैदानावर धरणे आंदोलनही केले होते. सदर प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी विश्रामगृहात तहसीलदार विशाल सोनवणे, महापालिकेच्या अतिक्रमण विभागातील अधिकाऱ्यांची पदाधिऱ्यांसमवेत बैठक झाली. बैठकीनंतर प्रशासनाने तातडीने कार्यवाही करीत अतिक्रमण निष्कासित केले. त्यामुळे दसरा मैदानावरील रावणदहन कार्यक्रमातील अडथळा दूर झाला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.