नाशिक

श्री व्यंकटेश बालाजीचा ब्रह्मकल्पोत्सव उत्साहात

CD
16152 मालेगाव : रथाेत्सवात सहभागी झालेले श्री व्यंकटेश बालाजी देवस्थानचे पदाधिकारी व भाविक ---- श्री व्यंकटेश बालाजीचा ब्रह्मकल्पोत्सव उत्साहात सकाळ वृत्तसेवा मालेगाव, ता. २३ : शहरातील श्री व्यंकटेश बालाजी देवस्थानचा २०४ वा ब्रह्मकल्पोत्सव व मोठा रथोत्सव उत्साहात पार पडला. गुरुवारी (ता.२२) मोठ्या रथाची मिरवणूक काढण्यात आली. शुक्रवारी (ता.२३) दुपारी महाआरती होऊन महाप्रसादाने उत्सवाची सांगता झाली. ध्वजपुजनाने ११ ऑक्टोबरला ब्रह्मकल्पोत्सवाची सुरवात झाली. १३ दिवसीय उत्सव काळात सहस्त्र तुलसी अर्चन, सहस्र पुष्प अर्चन, सहस्त्र कुमकुम अर्चन, दीप अर्चन, सहस्त्र हिरण्य अर्चन आदी धार्मिक कार्यक्रम मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडले. उत्सव काळात रोज सायंकाळी सातला श्री बालाजी पद्मावती सहित लक्ष्मी कल्याणोत्सव झाला. रोज रात्री आठला छोट्या रथातून श्री व्यंकटेश बालाजी भगवान यांची मिरवणूक काढण्यात आली. एकादशीच्या मुहूर्तावर सकाळी धनंजय सायखेडकर यांच्या हस्ते पुजा करून मोठा रथोत्सव मिरवणुकीला ''उत्सव माझ्या देवाचा, उत्सव माझ्या गावाचा'', गोविंदा, गोविंदा, गोविंदाचा जयघोष करीत ढोल ताशांच्या गजरात सुरुवात झाली. शहरातील मुख्य रस्ते व चौकातून काढण्यात आलेला रथोत्सव रात्री उशिरापर्यंत सुरू होता. उत्सव यशस्वितेसाठी देवस्थानचे अध्यक्ष गणेश चौधरी, उपाध्यक्ष यश बागड, राजेश दुसाने, व्यवस्थापक मिलिंद गोसावी, अमोल दुसाने, राजेश प्रभुणे, संदीप मगर, यश बागड, विजय कुलकर्णी, राजेंद्र बागडे आदींनी परिश्रम घेतले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BCCI Junior Selection Committee: भारताच्या माजी वेगवान गोलंदाजाकडे मोठी जबाबदारी! परविंदर अवाना बनले BCCI ज्युनियर निवड समितीचे अध्यक्ष

Kojagiri Purnima 2026: यंदा कधी आहे कोजागिरी पौर्णिमेचा मुहूर्त? जाणून घ्या पूजा विधी आणि पौराणिक कथा

Marathi News Live Updates: नाशिक कुंभमेळ्याआधी ५५० जणांचा सामूहिक शंखनाद; गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद होणार

IND W vs ZIM W: श्री चरणीची भेदक गोलंदाजी; झिम्बाब्वेचा डाव आटोपला, भारतासमोर किती धावांचं लक्ष्य?

Baramati News : निवडणूक पदवीधरची....बारामतीचे राजकारण ढवळून निघाले...

SCROLL FOR NEXT