नाशिक

मालेगावला ३४ वर्षीय तरुणीचा खून..

CD
मालेगावात तरुणीचा खून; पाच तासांत संशयिताला अटक सकाळ वृतसेवा मालेगाव, ता. १३ : येथील द्याने भागातील ३४ वर्षीय तरुणीचा मृतदेह अर्धवट जळालेल्या अवस्थेत चिंचगव्हाण शिवारात आढळून आला. या प्रकरणाचा तालुका पोलिसांनी अवघ्या पाच तासांत छडा लावत संशयिताला अटक केली. तरुणीची ओळख पटू नये, या उद्देशाने तिचा मृतदेह जाळण्याचा प्रयत्न केल्याचा प्राथमिक तपासात संशय आहे. अंजूम आसिफ शेख (वय ३४, रा. शमा हॉटेलजवळ, द्याने) असे मृत तरुणीचे नाव आहे. चिंचगव्हाण शिवारात तिचा मृतदेह आढळल्यानंतर नागरिकांनी तालुका पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी सामाजिक कार्यकर्त्यांच्या मदतीने मृतदेह सामान्य रुग्णालयात हलविला. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही चित्रणाची तपासणी केली असता, अंजूम ही गुलशेर नगर भागातील सय्यद कलीम सय्यद अकबर याच्यासोबत जात असल्याचे दिसून आले. त्यानुसार पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवून कलिमला अटक केली. पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, कलिमने अंजुमला लग्नाचे आमिष दाखविले होते. तसेच तिच्याकडून घेतलेले पैसे परत देण्याचे सांगून तो तिला सोमवारी (ता. १२) सायंकाळी चिंचगव्हाण शिवारात घेऊन गेला. तेथे शेतात तिच्या चेहऱ्यावर धारदार शस्त्राने वार करून खून केल्याचा संशय आहे. त्यानंतर ओळख पटू नये म्हणून मृतदेह जाळण्याचा प्रयत्न केल्याचे तपासात समोर आले आहे. या प्रकरणी कलीम मोहम्मद यांच्या तक्रारीवरून तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

Mamata Banerjee: ममता बॅनर्जींवर चाकू हल्ल्याचा प्रयत्न; हल्लेखोर महिला दारुच्या नशेत, शिव्याही दिल्या

Pune Crime : गणेशोत्सवात दागिने चोरणारी हरियाणाची टोळी गजाआड; साडेचार हजार किलोमीटर पाठलाग करून कारवाई

Mohol News : आठव्या दिवशीही जनहित शेतकरी संघटनेचे अध्यक्ष प्रभाकर देशमुख यांचे उपोषण सुरूच; प्रकृती खालावली, दोषी अधिकाऱ्यावर कारवाईची मागणी

Saudi Attack: 'हल्ल्यांचे व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करू नका!'... सौदीतील भारतीयांना कोणी दिला इशारा?

Kognoli Toll Protest: कोगनोळी टोलनाक्यावर तणाव! राजू शेट्टींचे स्वीय सहाय्यक स्वस्तिक पाटील आणि पोलिसांत बाचाबाची

SCROLL FOR NEXT