नाशिक

घात - अपघात

CD
दोन वेगवेगळ्या अपघातात दोन ठार मालेगाव ः तालुक्यातील मनमाड रस्त्यावरील चोंढी घाट व महामार्गावरील लोणवाडे फाटा या दोन वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या अपघातात दोघे तरुण ठार झाले. मालेगाव मनमाड रस्त्यावरील चोंढीजवळील वळण रस्त्यावर बसने (एमएच १४ एमएच ६६४७) दुचाकीला (एमएच १५ डीटी ७३४९) जबर धडक दिली. अपघातात दुचाकीस्वार कैलास खंडू गागरे (३८, रा. एरंडगाव) हा तरुण गंभीर जखमी झाल्याने जागीच ठार झाला. त्याचा मित्र ज्ञानेश्वर विठ्ठल देवरे जखमी झाला असून त्याच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. नवनाथ गागरे यांच्या तक्रारीवरून बसचालक सचिन सुरेश सुर्वे (रा. घोट, जि. सातारा) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. महामार्गावरील लोणवाडे फाट्यावर दुसरा अपघात झाला. व्हेंजर दुचाकीने (एमएच ०४ एचजी ८४१६) दुचाकीला (एमएच ४१ बीसी ८०३६) जबर धडक दिली. यात दुचाकीस्वार मोहम्मद इरशाद मोहम्मद सईद (३४, रा. संजरीनगर) हा डोक्याला जबर मार लागल्याने जागीच ठार झाला. तर पाठीमागे बसलेला अल्ताफ रियाज अहमद अन्सारी (३४, रा. फार्मसीनगर) हा गंभीर जखमी झाला. अल्ताफ अन्सारी यांच्या तक्रारीवरून धडक देणाऱ्या व्हेंजर दुचाकीस्वाराविरुद्ध (नाव, गाव माहित नाही) तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ED Raid : अवैध स्त्रीबीज खरेदी-विक्री रॅकेटप्रकरणी बारामती, ठाणे आणि नाशिकमध्ये ईडीचे छापे; २९ लाखांची रोकड जप्त

Ration Card e-KYC: रेशनकार्डधारकांसाठी महत्त्वाची बातमी! आता घरबसल्या करता येणार ई-केवायसी; जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

Latest Marathi News Live Update : 'हा' तर शिंदेंना गोत्यात आणण्याचा डाव; गुलाबराव पाटीलांनी केली ऑडिओ क्लिपच्या SIT चौकशीची मागणी

IND vs NZ 2nd T20: भारत न्यूझीलंडचा दुसरा टी-२० सामना कधी अन् कुठे पाहता येणार? LIVE Streaming, वेळ अन् TV चॅनेलची माहिती जाणून घ्या

Farmer Loan Waiver : कर्जमाफीची चौथी यादी जाहीर; पुण्यातील १६ हजार २४६ शेतकऱ्यांचा समावेश

SCROLL FOR NEXT