Molestation of a minor girl esakal
नाशिक

Nashik : अल्पवयीन तरुणीचा विनयभंग करणाऱ्यास अटक

सकाळ वृत्तसेवा

जुने नाशिक : अल्पवयीन मुलीचा (Minor Girl) विनयभंग (Molestation) केल्याप्रकरणी भद्रकाली पोलिस ठाण्यात बुधवारी (ता. ६) एका संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. सरफराज इम्तियाज असे त्याचे नाव आहे. वर्षभरापासून संशयित सरफराज इम्तियाज तरुणीची छेड काढत होता. (Man arrested for molesting minor girl Nashik Crime News)

मुलीने घडलेला प्रकार कुटुंबीयांना सांगितला. त्यांनी त्याची समजूत काढली. त्याच्या कुटुंबीयांनादेखील माहिती दिली. त्रास देणार नसल्याचे संशयिताने सांगितले. दरम्यान, तरुणी कुटुंबीयांसह वर्षभरापूर्वी परिसर सोडून दुसरीकडे राहण्यास गेली. संशयिताने त्या ठिकाणी जाऊनदेखील तिला त्रास देणे सुरू ठेवले. रविवारी (ता. ३) तरुणी कुटुंबीयांसह रिक्षातून जात असताना संशयिताने त्याची चारचाकी रिक्षासमोर आडवी लावली. त्यांना शिवीगाळ करू लागला. तरुणीचा हात धरून तू लग्न केले नाहीस तर आत्महत्या करून घेईन, अशी धमकी दिली. तिच्या वडिलांनी त्यास पकडण्याचा प्रयत्न केला. त्यांना धक्का देत संशयिताने तेथून पळ काढला, असे दिलेल्या तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. घटनेचे गांभीर्य लक्षात घेत तिच्या तक्रारीवरून भद्रकाली पोलिस ठाण्यात बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत आणि विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला. संशयित सरफराज इम्तियाज यास पोलिसांनी अटक केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT