ZP CEO Ashima Mittal, Nashik News esakal
नाशिक

ZP CEO Orders : गटविकास अधिकाऱ्यास कार्यारंभ आदेशाची प्रत देणे बंधनकारक; ZP CEO यांचे बांधकाम विभागास आदेश

सकाळ वृत्तसेवा

ZP Nashik News : जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागांतर्गत कार्यारंभ आदेशाची प्रत कार्यकारी अभियंता यांच्याकडून थेट ठेकेदारांच्या हातात सोपविली जात असल्याचे प्रकार वाढत चालले आहे.

या वाढत्या प्रकारामुळे तालुका गटविकास अधिकारी यांना तालुक्यात कामे सुरू झाली आहे की नाही याचा माहिती नसल्याचे समन्वय समितीच्या बैठकीत निर्दशनास आले. त्यावर, मुख्यकार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी गटविकास अधिकाऱ्यास कार्यारंभ आदेशाची प्रत देणे बंधनकारक केले आहे.

केवळ बंधनकारक केले नसून, त्यावर पहिले अशी स्वाक्षरी घेणे देखील सक्तीची केली आहे. त्यामुळे कार्यकारी अभियंता यांचे चांगलेच धाबे दणाणले आहे. (Mandatory to give copy of commencement order to Group Development Officer ZP CEO orders to Construction Department Nashik news)

यासंदर्भात मुख्यकार्यकारी अधिकारी मित्तल यांनी बांधकाम विभागाच्या तिन्ही कार्यकारी अभियंत्यांना पत्र काढून आदेश निर्गमित केले आहे. या आदेशामुळे आता कार्यकारी अभियंता यांना उपअभियंता, शाखा अभियंता मार्फत गटविकास अधिकारी यांना कार्यारंभ आदेशाची प्रत द्यावी लागणार आहे.

बांधकाम विभागाकडून काम वाटप समितीची बैठक होते. या बैठकीत कामांचे वाटप निश्चित होते. हे वाटप निश्चित झाल्यानंतर ठेकेदारास कार्यारंभ आदेशाची प्रत दिली जाते. यासोबत शाखा अभियंता, उपअभियंता यांना देखील देण्यात येते.

परंतू, संबंधित अधिका-यांकडून गटविकास अधिकारी यांनी कळविले जात नसल्याचे गत आठवड्यात जिल्हा परिषदेत खातेप्रमुख व गटविकास अधिकारी यांची समन्वय बैठकीत निर्दशनास आले. त्यावर मित्तल यांनी पत्र काढत, कार्यारंभ आदेशाची प्रत देणे बंधनकारक केली आहे.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

बांधकाम विभागांमार्फत जी काही कामे सुरू आहेत किंवा सुरू होत असतात, त्या कामांच्या कार्यारंभ आदेशांच्या प्रती गट विकास अधिकारी यांना प्राप्त होत नसल्याने गटविकास अधिकारी यांना आपल्या तालुक्यात किती कामे सुरू आहेत, या बाबत माहिती मिळत नाही.

वास्तविक, सर्व कार्यकारी अभियंता यांनी ही प्रत गटविकास अधिकाऱ्यांना दिली पाहिजे. तसेच या कामांची प्रत संबंधित तालुक्यांच्या उप अभियंता/शाखा अभियंता यांना प्राप्त झालेनंतर त्यांनीही ती प्रत गटविकास अधिकारी यांचे निदर्शनास आणून द्यावी व त्यावर गट विकास अधिकारी यांनी ‘पाहिले’ म्हणून स्वाक्षरी घ्यावी, असे पत्रात नमूद केले आहे.

सर्व कामांच्या प्रती या गटविकास अधिकारी यांना उपअभियंता यांचेमार्फत पाहोच कराव्यात व त्यावर गटविकास अधिकारी यांची स्वाक्षरी घ्यावी, असे निर्देश देखील मित्तल यांनी दिले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan Inflation: पाकिस्तान संकटात! अन्न टंचाई, डिझेल-LPG महागाईने जनतेचं कंबरडं मोडलं

LPG Crisis : एलपीजी संकटादरम्यान सरकारने आखली मोठी रणनीती, सामान्यांना दिलासा; गॅस सिलिंडर अन् PNG बाबत महत्त्वाची अपडेट समोर

Horoscope : उद्या अश्विनी मेषेर्कचा दुर्लभ योग! मेषसह 'या' 4 राशींना आर्थिक लाभ संभवतो; महिन्याभरात होईल भरभराट, नात्यात कलाटणीचा क्षण

Bihar Politics: ''बिहारचा मुख्यमंत्री कोण होणार? भाजपचे दोन नेते ठरवणार'', प्रशांत किशोर काय बोलले?

Latest Marathi News Live Update: रत्नागिरीत बंदुकीने गोळ्या झाडून घेत युवकाची आत्महत्या

SCROLL FOR NEXT