NSK26H32432
जळगाव : अभिजात मराठी भाषा सप्ताहाच्या कार्यक्रमात उपस्थित मान्यवर.
---
खानदेशी बोलीभाषांच्या जतनासाठी विद्यापीठात केंद्र
डॉ. उदय सामंत : सहा महिन्यांत स्थापना, मराठी भाषा विभागाकडून देणार निधी
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. १४ : खानदेशातील समृद्ध बोलीभाषांचे जतन व संवर्धन करण्यासाठी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात येत्या सहा महिन्यांत बोलीभाषा केंद्र सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठी मराठी भाषा विभागाकडून निधी उपलब्ध करून दिला जाईल, असे प्रतिपादन राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री डॉ. उदय सामंत यांनी केले.
राज्य शासनाच्या मराठी भाषा विभाग आणि कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या भाषा अभ्यास प्रशाळा व संशोधन केंद्राच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘अभिजात मराठी भाषा सप्ताह-२०२६’च्या सांगता सोहळ्यात ते बोलत होते. बुधवारी (ता. १४) विद्यापीठातील ए.पी.जे. अब्दुल कलाम भवनाच्या सभागृहात हा कार्यक्रम झाला.
अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना कुलगुरू प्रा. व्ही. एल. माहेश्वरी म्हणाले, की मराठी ही केवळ संवादाची भाषा नसून संस्कार, अस्मिता, संस्कृती आणि भावविश्वाची भाषा आहे. जागतिक ज्ञान आत्मसात करण्यासाठी विविध भाषा शिकल्या पाहिजेत; मात्र त्याचवेळी मातृभाषेचा अभिमान बाळगून तिचे संवर्धन करणेही तितकेच महत्त्वाचे आहे.
खासदार स्मिता वाघ, विद्यापीठाचे प्र-कुलगुरू प्रा. एस. टी. इंगळे, राज्य मराठी विकास संस्थेचे संचालक डॉ. श्यामकांत देवरे, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक प्रा. प्रवीण महाले आणि भाषा व विचारधारा प्रशाळेचे संचालक प्रा. म. सु. पगारे, विष्णू भंगाळे या वेळी उपस्थित होते.
डॉ. श्यामकांत देवरे यांनी प्रास्ताविक केले. खेमराज पाटील यांनी सूत्रसंचालन केले. तर प्रा. म. सु. पगारे यांनी आभार मानले.
चौकट
लोकसंस्कृतीच्या सादरीकरणाने रंगत
सांगता सोहळ्यानंतर आयोजित विशेष सांस्कृतिक कार्यक्रमाने उपस्थितांची मने जिंकली. सुप्रसिद्ध गायक डॉ. अभिजित कोसंबी, सायली कोसंबी आणि प्रसन्नजीत कोसंबी यांच्या गायनाने कार्यक्रमात रंगत आणली. अभिनेते दिगंबर नाईक यांच्या अभिनयानेही उपस्थितांची दाद मिळविली. नृत्यदिग्दर्शक सुभाष नकाशे आणि त्यांच्या ६० कलाकारांच्या समूहाने सादर केलेल्या नृत्याविष्काराने कार्यक्रमाची शोभा वाढविली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.