धुळे : टुडे १ साठी..
--
फोटो क्रमांक : 33046
धुळे : दसऱ्याच्या पूर्वसंध्येला बाजारपेठेत विक्रीसाठी दाखल झेंडूची फुले खरेदी करताना ग्राहक.
--
झेंडूच्या दरात कमालिची घसरण
--
आवक वाढल्याने दर ३० ते ५० रूपये किलोवर
सकाळ वृत्तसेवा
धुळे, ता. १९ : जिल्ह्यात सध्या नवरात्रोत्सवाचा उत्साह शिगेला पोहोचला असून आदिशक्तीच्या दर्शनासाठी भाविकांची मंदिरांमध्ये गर्दी होत आहे. देवीच्या चरणी अर्पण करण्यासाठी भाविक मनोभावे पूजा साहित्यासह फुले आणि फुलहार खरेदी करत आहेत. मात्र, गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा बाजारात झेंडूच्या फुलांचे दर घसरल्याचे चित्र आहे. मागील वर्षी नवरात्रीत १०० ते १२० रुपये किलो दराने विक्री होणारी झेंडूची फुले यंदा अवघ्या ३० ते ५० रुपये किलोवर आली आहेत.
-
फुलांचे दर घसरल्याने बाजारातील तयार फुलहार आणि फुलांच्या किमती काही अंशी कमी झाल्या आहेत. जिल्ह्यात सध्या दुष्काळी स्थिती असली तरी अवकाळी पावसाची शक्यता नसल्यामुळे आणि शेतातील झेंडू वेळेपूर्वीच बाजारात आल्याने आवक प्रचंड वाढली आहे. अवकाळी पावसाने फुले खराब होण्याच्या भीतीने शेतकऱ्यांनी वेळेआधीच माल बाजारात आणल्यामुळे भावात घसरण झाली. दरम्यान दसऱ्याच्या दिवशी घर, दुकाने आणि वाहनांना तोरणे बांधण्यासाठी झेंडूच्या फुलांना मागणी असते. मागणी वाढल्यास किमतीत वाढ होईल, या आशेने काही शेतकऱ्यांनी आपली फुले अद्याप विक्रीसाठी आणली नव्हती. दसऱ्याच्या आदल्या दिवशी सोमवारी (ता. १९) अनेक शेतकऱ्यांनी हा माल बाजारात आणला. मात्र तरीही ५० रुपये प्रति किलोपेक्षा अधिक दर मिळू शकलेला नाही. सध्या बाजारात फुलांची आवक मुबलक असल्याने दर नियंत्रणात आहेत. मात्र मागणी व पुरवठ्याच्या नियमानुसार दसऱ्याच्या दिवशी झेंडूच्या फुलांना मागणी वाढून दरात सुधारणा होण्याची शक्यता विक्रेत्यांनी व्यक्त केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.