Nashik Latest Crime News esakal
नाशिक

Nashik : विवाहितेची आत्महत्या; तिघांना अटक

सकाळ वृत्तसेवा

वणी (जि. नाशिक) : लखमापूर (ता. दिंडोरी) येथे पती, सासू व सासऱ्याने विवाहितेचा छळ (harassment) करून तिला आत्महत्येस (Suicide) प्रवृत्त केल्याची तक्रार वणी पोलिसांत दाखल झाली असून, पतीसह तिघांना पोलिसांनी अटक केली आहे. (Married women Suicide 3 arrested Nashik Latest Crime News)

विवाहितीचेे वडील यादव चंद्रकांत वाघमारे (वय ४५, रा. देवळी कराड, ता. कळवण) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, की काजल पवार (वय २३, रा. हतगड, ह.मु. लखमापूर) हिचा तुषार अर्जुन पवार याच्याशी विवाह झाला होता. विवाहानंतर सासरच्यांनी महिनाभर चांगले वागविले.

नंतर लग्नात मानपान दिला नाही, लग्न चांगले केले नाही, असे वेळोवेळी टोमणे मारत काजल हिचे जगणे असह्य केले. वेळोवेळी झालेल्या त्रासामुळे काजलने राहत्या घरी नायलाॕनच्या दोरीने गळफास घेऊन जीवनयात्रा संपविली. काजलच्या मृत्यूस पती तुषार पवार, सासरे अर्जुन पवार, सासू मृणालिनी पवार (सर्व रा. हतगड, ता. सुरगाणा) हे जबाबदार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Without Fear or Favour Book Controversy : "विदाउट फ़ियर ऑर फ़ेवर" पुस्तकातील दाव्यांची जोरदार चर्चा; न्यायपालिकेच्या स्वातंत्र्यावरून नवा वाद!

सूर्याचा राहूच्या नक्षत्रात प्रवेश; वृषभसह ५ राशींना नोकरी अन व्यवसायात आर्थिक लाभ

IMD Weather Alert : चक्रीवादळाने रौद्ररूप धरले! ताशी १०० किमी वेगाने सुटणार सोसाट्याचा वारा; 'या' राज्यांत मुसळधार पाऊस, महाराष्ट्रात काय घडणार?

फ्लिपकार्टच्या गोदामातून ९८० सॅमसंग मोबाईल चोरीला; पुरावा मिळू नये म्हणून CCTV चा डीव्हीआरही पळवला...

Jamgaon News: रविवारी सुट्टी असतानाही सीईओंची जामगावला भेट; अपघातात मृत सेविकेच्या कुटुंबीयांचे सांत्वन

SCROLL FOR NEXT