नाशिक

प्रसूतिगृह अंतिम टप्प्यात

CD
धुळे : टुडे पान २ साठी..मेन -- फोटो क्रमांक : 33499 धुळे : मिल परिसरात सुरू असलेल्या प्रसूतिगृहाच्या कामाच्या पाहणीवेळी नगरसेवक अमोल मासुळे, सुरेखा उगले, चंद्रकांत उगले, भूषण ढवळे, मनोज गर्दे आदी. -- मिल परिसरात साडेतीन कोटींचे प्रसूतिगृह अंतिम टप्प्यात -- नवीन वर्षात लोकार्पण होणार; १२ खाटांची सुविधा, नवजात बालकांसाठी एनआयसीयू सकाळ वृत्तसेवा धुळे, ता. २५ : शहरातील प्रभाग क्रमांक सतरामधील मिल परिसरात महापालिकेच्या शाळा क्रमांक २८ च्या आवारात (स्व.) द्वारकाआई उत्तमराव गर्दे प्रसुतिगृहाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. सुमारे साडेतीन कोटी रुपये खर्चून उभारण्यात येत असलेल्या या प्रसूतिगृहाचे नवीन वर्षात पणन व राजशिष्टाचार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल आणि आमदार अनुप अग्रवाल यांच्या हस्ते लोकार्पण होणार आहे. या सुविधेमुळे परिसरातील सुमारे ६० ते ७० हजार नागरिकांना, विशेषतः गर्भवती महिलांना मोठा दिलासा मिळणार आहे. - मिल परिसरातील महिलांना प्रसुतीसाठी हिरे वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात किंवा साक्री रोडवरील जिल्हा रुग्णालयात जावे लागते. रात्रीच्या वेळी रुग्णालयापर्यंत पोहोचताना अनेक अडचणी येतात. खासगी रुग्णालयांचा खर्चही अनेक कुटुंबांना परवडत नाही. ही गरज लक्षात घेऊन प्रभागातील नगरसेवक अमोल मासुळे आणि नगरसेविका सुरेखा उगले यांनी प्रसुतिगृहाची संकल्पना मांडून निधीसाठी पाठपुरावा केला. पालकमंत्री रावल आणि आमदार अग्रवाल यांच्या माध्यमातून या कामासाठी निधी मंजूर झाला. प्रसुतिगृहाला (स्व.)द्वारकाआई गर्दे यांचे नाव देण्याचा ठरावही महापालिकेत एकमताने मंजूर करण्यात आला. नगरसेवक मासुळे, नगरसेविका उगले, शहर अभियंता चंद्रकांत उगले, अभियंता भूषण ढवळे, जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष मनोज गर्दे यांनी प्रसूतिगृहाच्या कामाची नुकतीच पाहणी केली. या सुविधेमुळे परिसरातील नागरिकांना विशेषता महिलांना उत्तम आरोग्यसेवा जवळच उपलब्ध होणार आहे. - १४-१ ..चौकट.. १४-१ सुविधांनी सज्ज प्रसूतिगृह चितोड रोडवरील ध्वज चौकासमोरील महापालिकेच्या शाळा क्रमांक २८ च्या आवारात गेल्या आठ महिन्यांपासून सुरू असलेल्या कामाला वेग आला आहे. प्रसूतिगृहात १२ खाटांसह नवजात बालकांसाठी नवजात अतिदक्षता विभागाची (एनआयसीयू) सुविधा उपलब्ध होणार आहे. तज्ज्ञ डॉक्टर आणि कर्मचारी २४ तास सेवेत राहणार असून, आपत्कालीन परिस्थितीसाठी रुग्णवाहिकेचीही व्यवस्था करण्यात येणार आहे. येत्या दोन ते तीन महिन्यांत काम पूर्ण होण्याची अपेक्षा आहे.

''वृक्षतोडीबाबत ‘फेक नॅरेटिव्ह’ पसवण्याचा प्रयत्न'', CM फडणवीसांनी सांगितलं कर्जतमधील टोरेंट प्रकल्पाचं महत्त्वं, काय म्हणाले?

'मला साडीत बघून माझ्या सासूने ओळखलंच नाही'; सचिन पिळगांवकरांनी माधुरी दीक्षितला सांगितला 'अशी ही बनवाबनवी'चा किस्सा, म्हणाले...

Beed FDA Action: दिवाळीपूर्वी बीडमध्ये FDA चे छापे; पाबळे नमकीन आणि मामा काठियावाडीचे परवाने निलंबित

‘एका तासात इस्रायलला राहण्यायोग्य ठेवणार नाही’; इराणचा नेतान्याहूंना थेट इशारा, थेट नकाशाच शेअर केला...

Pune MPSC News: एमपीएससी चौकशी आयोगाची अद्याप एकही बैठक नाही; उर्वरित ४५ दिवसांत तपास कसा पूर्ण होणार?

SCROLL FOR NEXT