महापौरांचा दिवाळीपूर्वी
शहर स्वच्छतेचा संकल्प
उद्यापासून प्रभागनिहाय विशेष मोहीम
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. १३ : नवरात्रोत्सव आणि विजयादशमीनंतर आता दिवाळीच्या सणाची तयारी सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर शहरातील स्वच्छतेला गती देण्यासाठी जळगाव महापालिकेतर्फे ‘महापौर स्वच्छता संकल्प अभियान’ राबविण्यात येणार आहे. महापौर दीपमाला काळे यांनी यासंदर्भात आरोग्य विभागाला पत्र देऊन विशेष स्वच्छता मोहीम राबविण्याच्या सूचना केल्या आहेत. १५ ऑक्टोबरपासून सुरू होणारी ही मोहीम ४ नोव्हेंबरपर्यंत प्रभागनिहाय राबविण्यात येणार आहे.
शहरातील विविध भागांत सणासुदीच्या काळात नागरिकांची वर्दळ वाढते. बाजारपेठा, रस्ते आणि सार्वजनिक ठिकाणी कचरा साचण्याचे प्रमाणही वाढते. नियमित कचरा संकलन आणि स्वच्छतेच्या कामांमध्ये त्रुटी राहिल्यास अस्वच्छतेची समस्या गंभीर होऊ शकते. त्यामुळे महापालिकेने विशेष स्वच्छता मोहीम हाती घेऊन शहर स्वच्छ ठेवण्यावर भर द्यावा, असे महापौरांनी पत्रात नमूद केले आहे.
चौकट
प्रभागनिहाय मोहिमेचे नियोजन
महापौरांच्या सूचनेनुसार, १५ ऑक्टोबरला प्रभाग क्रमांक १ पासून मोहिमेला सुरुवात होईल. त्यानंतर १६ ते २६ ऑक्टोबरदरम्यान प्रभाग क्रमांक २ ते ९ मध्ये, तर २७ ऑक्टोबर ते २ नोव्हेंबरदरम्यान प्रभाग क्रमांक १० ते १६ मध्ये स्वच्छता मोहीम राबविण्यात येईल. ३ नोव्हेंबरला प्रभाग क्रमांक १७ व १८, तर ४ नोव्हेंबरला प्रभाग क्रमांक १८ व १९ मध्ये विशेष स्वच्छता केली जाणार असल्याचे पत्रातील वेळापत्रकात नमूद आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.