नाशिक

मानसिक आरोग्य दिनानिमित्त रॅली

CD
धुळे टुडे १ साठी अँकर... --- फोटो- NSK26H31955 धुळे ः जागतिक मानसिक आरोग्य दिन, पॅलिएटिव्ह केअर दिनानिमित्त काढलेल्या जनजागृती रॅलीत सहभागी डॉ. रवींद्र सोनवणे व इतर मान्यवर, आरोग्य कर्मचारी. --- मानसिक समस्या असणाऱ्यांना समजून घेण्याची गरज डॉ. रवींद्र सोनवणे; मानसिक आरोग्य व पॅलिएटिव्ह केअर दिनानिमित्त जनजागृती रॅली सकाळ वृत्तसेवा धुळे, ता. ११ ः मानसिक आरोग्याच्या समस्यांशी सामना करणाऱ्या व्यक्तींना अनेकदा आजारापेक्षा समाजातील गैरसमज, भीती आणि नकारात्मक दृष्टिकोनाचा अधिक त्रास सहन करावा लागतो. अशा व्यक्तींना दोष देणे किंवा त्यांच्यापासून अंतर राखणे योग्य नाही. त्यांचे म्हणणे शांतपणे ऐकून घेणे, त्यांना समजून घेणे आणि आवश्यकतेनुसार समुपदेशन व उपचारांसाठी प्रोत्साहित करणे ही प्रत्येकाची सामाजिक जबाबदारी आहे, असे प्रतिपादन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. रवींद्र सोनवणे यांनी केले. ‘सेवा संकल्प अभियानांतर्गत’ जागतिक मानसिक आरोग्य दिन आणि पॅलिएटिव्ह केअर दिनानिमित्त शनिवारी (ता. १०) धुळे शहरात जनजागृती रॅली काढण्यात आली. जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते यांच्या निर्देशानुसार जिल्हा रुग्णालयाच्या वतीने रॅलीचे आयोजन करण्यात आले. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सोनवणे यांनी हिरवा झेंडा दाखवून रॅलीचा प्रारंभ केला. या वेळी त्यांनी मानसिक आरोग्याच्या समस्यांचा अनुभव घेतलेल्या व्यक्तींचे म्हणणे संवेदनशीलतेने ऐकून घ्यावे, त्यांच्या भावनांचा आदर करावा आणि त्यांना समाजात सन्मानाने जगण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन केले. मानसिक आजारांची लक्षणे वेळीच ओळखली आणि योग्य उपचार घेतले, तर अनेक मानसिक आरोग्य समस्यांवर प्रभावी उपचार करता येतात. त्यामुळे मानसिक आरोग्याविषयी मनात संकोच, भीती किंवा न्यूनगंड बाळगू नये. गरज भासल्यास नागरिकांनी जिल्हा रुग्णालयातील मानसोपचार विभागात उपलब्ध असलेल्या आरोग्यसेवा आणि समुपदेशन सुविधांचा लाभ घ्यावा, असेही डॉ. सोनवणे यांनी सांगितले. यांचा सहभाग, सहकार्य जिल्हा रुग्णालयातून सुरू झालेली ही जनजागृती रॅली जिल्हा परिषद मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत काढण्यात आली. या रॅलीत जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, आदित्य बिर्ला संवेदना प्रकल्प, शासकीय नर्सिंग कॉलेज, सेवा नर्सिंग कॉलेज, सरस्वती नर्सिंग कॉलेज तसेच राष्ट्रीय किशोर स्वास्थ्य कार्यक्रम यांचे प्रतिनिधी आणि विद्यार्थी सहभागी झाले. या कार्यक्रमास अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. समीर शेख, डॉ. विवेक जाधव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे मुख्य लोक अभिरक्षक डी. एस. महाजन, सहायक लोक अभिरक्षक मुकेश पाचपुते, जिल्हा मानसिक आरोग्य कार्यक्रमाचे डॉ. हरीश मेहरा आणि मनोविकृतीतज्ज्ञ डॉ. विक्रम वैद्य उपस्थित होते.

विराट कोहलीवर पाच कोटींचा आरोप करणाऱ्या फलाहारी महाराजांनी मागितली माफी, म्हणाले...

IND vs WI, 3rd T20I: अभिषेक शर्माचे वादळी अर्धशतक अन् भारताच्या ऑलआऊट होऊनही २०० धावा पार; विंडीजसमोर किती धावांचं लक्ष्य?

३५ वर्षीय प्रसिद्ध अभिनेत्रीच्या शरीराचा सौदा, ठाण्यात हायप्रोफाईल देहविक्रीचे रॅकेट उघड; महिलेला रंगेहाथ अटक

Daily Horoscope: आजचे राशिभविष्य : मेषसह या राशींना व्यवसायात यश; काहींना अचानक धनलाभाची शक्यता

दिल्लीहून चेन्नईला जाणाऱ्या विमानाला आग!, प्रवाशी म्हणाले, 'असं वाटलं आज शेवटचा दिवस...', इंडिगो विमानात असं काय घडलं?

SCROLL FOR NEXT