janaashirwad yatra esakal
नाशिक

जनआशीर्वाद यात्रेत भाजपच्याच कार्यकर्त्यांचा राडा!

संतोष विंचू

येवला (जि.नाशिक) : केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार (dr bharati pawar) यांच्या प्रमुख उपस्थितीत निघालेली जनआशीर्वाद यात्रा (jan aashirwad yatra) गुरुवारी (ता.२६) विंचूर चौफुलीवर आली. या ठिकाणी स्थानिक भाजप पदाधिकारी (bjp activists) मोठ्या संख्येने यात्रेच्या स्वागतासाठी उपस्थित होते. राज्यभर भाजप- शिवसेनेमध्ये (bjp-shivsena) राडेबाजी सुरू असताना येथे भाजपच्या गटातच राडे झाल्याचे गुरुवारी चौफुलीवर जनआशीर्वाद यात्रेच्यावेळी दिसून आले.

थेट मंत्र्यांसमोरच राडेबाजी

केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत निघालेली जनअशीर्वाद यात्रा गुरुवारी (ता.२६) विंचूर चौफुलीवर आली. या ठिकाणी स्थानिक भाजप पदाधिकारी मोठ्या संख्येने यात्रेच्या स्वागतासाठी उपस्थित होते. शहर पोलिस ठाण्यात तालुकाध्यक्ष नंदकिशोर शिंदे यांनी जनअशीर्वाद यात्रेसाठी परवानगी घेतली होती. मात्र विंचूर चौफुलीवरून मिरवणूक सप्तशृंगी मंदिरामार्गे न्यावी, असे ज्येष्ठ नेते नगरसेवक प्रमोद सस्कर यांचे, तर मिरवणुकीचा मार्ग इंद्रनील कॉर्नरवरून असल्याचे जिल्हा उपाध्यक्ष आनंद शिंदे यांचे म्हणणे होते. या मार्ग निश्चितवरून दोन गटांत चौफुलीवरच गटबाजीचे प्रदर्शन झाले. थेट मंत्र्यांसमोर राडेबाजी होत असल्याने पोलिसांनी परवानगी घेतलेल्या मार्गावरूनच रथ नेत दोन्हीही गटांच्या कार्यकर्त्यांना बाजूला सारले. केंद्रीय राज्यमंत्री डॉ. पवार आणि उत्तर संघटनमंत्री रवी अनासपुरे, जिल्हाध्यक्ष केदा आहेर रथातूनच आपल्याच पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची गटबाजीचे प्रदर्शन पाहत होते.

शाब्दिक चकमक झाल्याने गोंधळ

जनआशीर्वाद यात्रा शनी पटांगणावर आल्यानंतरही पुन्हा स्वागतावेळी दोन गटांतील संघर्ष दिसून आला. डॉ. पवार यांचे या ठिकाणी प्रमोद सस्कर यांनी सत्कार करत स्वागत केले. डॉ. पवार स्थानिक भाजप पदाधिकाऱ्यांना मला पुढे कार्यक्रम आहे, तुम्ही असा आग्रह करू नका, असे वारंवार सांगत होत्या. शहरात अनेक ठिकाणी नागरिकांनी डॉ. पवार यांचे स्वागत केले. टिळक मैदानावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास मंत्री डॉ. पवार यांच्या हस्ते हार अर्पण करण्यात आल्यानंतर मुरलीधर मंगल कार्यालयात सर्वधर्मीयांच्या वतीने डॉ. पवार यांचा सत्कार झाला. या ठिकाणीही शाब्दिक वाकयुद्ध झाल्याचे सांगण्यात आले. विंचूर चौफुलीवर डॉ. पवार यांचे आगमन झाल्यावर त्या स्वार असलेला रथ कोणत्या मार्गावर न्यायचा यावरून गटबाजीचे जोरदार प्रदर्शन दिसले. विशेष म्हणजे डॉ. पवार रथावर स्वार असताना कार्यकर्ते रथाला धरून इकडे- तिकडे ओढत होते. या वेळी शाब्दिक चकमक झाल्याने गोंधळ उडाला. पोलिस निरीक्षक संदीप कोळी यांनी मध्यस्थी केल्यानंतर यात्रा नियोजित स्थळी गेली.

विंचूर चौफुली ते इंद्रनील कॉर्नरपर्यंत दुकाने बंद आहेत. शिवाय छोटा व खराब रस्ता आहे. त्यामुळे अनेकजण पसंती देत असलेल्या सप्तशृंगी मंदिराकडून मिरवणूक न्यायला हवी होती. बुधवारी रात्री नियोजनात या मार्गाने जायचे ठरले होते. या मार्गावर स्वागतासाठी महिला व नागरिक उपस्थित असल्याने येथून यात्रा न्यावी, असे आपण सांगत होतो, मात्र काहींनी न ऐकता विनाकारण दुसरा मार्ग निवडला. - प्रमोद सस्कर, नगरसेवक, भाजप

आम्ही पोलिस ठाण्यात इंद्रनील मार्गाने जाण्याची परवानगी घेतली होती. त्या मार्गाने मिरवणूक न्यावी, असे म्हणत होतो. सस्कर यांना यात्रेचा मार्ग माहीत नव्हता. तिकडून रस्ता खराब असल्याने रथ जाऊ शकणार नसल्याचे समजावून सांगितल्यावर ठरल्याप्रमाणे रथ गेला. कोणताही वाद झालेला नाही. - आनंद शिंदे, जिल्हा उपाध्यक्ष

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs RR Live: इशान किशन बरसला, हेनरिच क्लासनही जबरदस्त खेळला; पण, राजस्थानच्या गोलंदाजांचे पुनरागमन, नितीश रेड्डी भिडला

MPSC पदसंख्या वाढ, मेडिकल कौन्सिल नियमांमध्ये बदल अन्...; मंत्रिमंडळ बैठकीत महायुती सरकारचे ८ महत्त्वाचे निर्णय

MPSC Success Story: पहुरजिऱ्याचा अजय दिघडेचा पराक्रम; MPSC उत्तीर्ण होऊन असिस्टंट कमिशनर पदावर झेप, आई-वडिलांच्या कष्टांना यशाची किनार..

SRH vs RR Live: इशान किशनचे शतक थोडक्यात हुकले! पण, जिंकली Orange Cap; झेल घेताना दोन खेळाडू एकमेकांना आपटले

Gadchiroli Health: कोरची तालुक्यात गरोदर मातेसह बाळाचा मृत्यू; आशा वर्करची टाळाटाळी, रुग्णालयात ऑक्सिजनची कमतरता अन्..

SCROLL FOR NEXT