डोंगराळे बातमी प्रतिक्रिया - दादा भुसे व इतर
---------------------------------------
न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत करतो. पीडितावर नराधमाने लैंगिक अत्याचार करून तिचा खून केला. या घटनेने महाराष्ट्रात संतापाची लाट होती. मालेगावकरांच्या भावनांचा विचार करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विशेष सरकारी वकील ॲड. उज्ज्वल निकम यांच्याकडे या खटल्याची जबाबदारी सोपवली. त्यांच्यासह पोलिस प्रशासनाने शास्त्रीय पद्धतीने पुराव्याची मालिका उभी केली. मालेगाव बार असाेसिएशनने आरोपीचे वकीलपत्र घेतले नाही. ॲड. निकम व न्यायदेवतेसह सर्वांचे आभार मानतो. भविष्यात कोणी असे क्रूरकर्म करण्याची हिंमत करणार नाही असा संदेश या निकालाच्या माध्यमातून गेला आहे.
- दादा भुसे, शिक्षणमंत्री (फोटो -16113)
----------------------------------------
न्यायदेवतेने दिलेला आजचा निर्णय अतिशय याेग्य आहे. नैसर्गिक तत्त्वावरचा आहे. या निर्णयाने नवरात्रोत्सवात खऱ्या अर्थाने नारी शक्तीचा सन्मान झाला. दसऱ्याला आपण रावण दहन करतो. न्यायालयाच्या निर्णयाने नवरात्राच्या या पर्वात वासना व समाजाच्या विकृतीच्या रावणाचे दहन झाले आहे.
- ॲड. स्नेहा शर्मा- ठाकरे, मुळ फिर्यादीच्या वकील (फोटो -16114)
------------------------------------------
पिडीत मुलीला व कुटुंबीयांना खऱ्या अर्थाने न्याय मिळाला. हा न्याय व्यवस्थेचा विजय आहे. सरकार पक्षाची बाजू ॲड. उज्ज्वल निकम यांनी अत्यंत प्रभावीपणे मांडली. तपास अधिकारी व पोलिसांनी उत्कृष्ट तपास केला. बाल साक्षीदाराची साक्ष महत्त्वपूर्ण ठरली. आरोपीच्या पापाचा घडा भरला होता. तो आज पूर्ण झाला.
- ॲड. संजय सोनवणे, विशेष सरकारी वकील (फोटो -16115)
------------------------------------
डोंगराळेची घटना संवेदनशील गुन्हा होता. आरोपीला अटक केल्यानंतर तपासाला गती दिली. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली व सहकाऱ्यांच्या मदतीने २१ दिवसात ४२५ पानांचे आरोपपत्र न्यायालयात दाखल केले. खटल्यात परिस्थितिजन्य पुरावे गोळा करून त्यांची सांगड घातली. आरोपीला फाशीची शिक्षा झाल्याने न्यायदेवतेचे आभार मानतो.
- यशवंत बावीस्कर, उपअधिक्षक तथा तपास अधिकारी (फोटो -16116)
---------------------------------------
पोलिसांनी कमी वेळेत सबळ पुरावे गोळा करून न्यायालयात सादर केले. त्या वेळी शहरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न देखील गंभीर होता. तपास करताना अनेक आव्हाने होती, तरीही पोलिसांनी योग्य दिशेने तपास केल्याने आरोपीला न्यायालयाने सबळ पुराव्याच्या आधारावर फाशीची शिक्षा सुनावली.
- तेगबीर सिंह संधू, तत्कालीन अपर पोलिस अधीक्षक, मालेगाव (फोटो -NSK26H32742)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.