Divisional Commissioner Radhakrishna Game Fake WhatsApp Account latest marathi news
Divisional Commissioner Radhakrishna Game Fake WhatsApp Account latest marathi news esakal
नाशिक

विभागीय आयुक्तांच्या फोटोचा Social Mediaवर गैरवापर; 4 दिवसात दुसरा गुन्हा दाखल

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : चार दिवसांपूर्वीच महापालिका आयुक्तांच्या फोटोचा गैरवापर करून अनेकांना मेसेजेस्‌ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेला असतानाच, महसुलचे विभागीय आयुक्तांचा फोटो व्हाटॅसॲपवर वापरून गैरवापर करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी दुसरा गुन्हा नाशिक सायबर पोलिसात दाखल झाला आहे. (Misuse of Divisional Commissioner Photo on Social Media Second case filed in 4 days Nashik Cyber Crime Latest marathi news)

शिवाजी मधुकर चव्हाणके (रा. गंगापूर रोड) यांच्या फिर्यादीनुसार, अज्ञात भामट्याने गेल्या शुक्रवारी (ता.५) ९३४०२३३४६८ या व्हॉटसॲप क्रमांकावर नाशिक विभागीय महसुल कार्यालयाचे विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांचा फोटो विनापरवानगी डीपी म्हणून वापरला. तसेच, त्यांची ऑनलाईन पद्धतीने ओळख चोरी करण्याचा प्रयत्न केला आहे. याप्रकरणी नाशिक सायबर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरज बिजली हे गुन्ह्याचा तपास करीत आहेत.

दरम्यान, गेल्या चार दिवसातील अशास्वरुपाचा दुसरा गुन्हा दाखल झाला आहे. यापूर्वी महापालिकेचे नवनियुक्त आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार यांचा फोटो व्हॉटसॲपच्य डीपीला वापरून एका विशिष्ठ मोबाईल क्रमांकावरून मेसेजेस्‌ करण्यात आले होते.

याप्रकरणी सायबर पोलिसांच्या तपासात एका व्यक्तीच्या मोबाईलचे व्हॉटस्‌ॲप हॅक करून अज्ञात भामट्याने सदरचा प्रकार केल्याचे समोर आले आहे. या दोघ घटनांवरून अज्ञात भामटे शासकीय अधिकाऱ्यांच्या फोटोचा वापर सोशल मीडियावर करून फसवणूक करण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dharashiv Loksabha election : ...म्हणून ओमराजे निंबाळकर शिंदेंसोबत गेले नाहीत; 'सकाळ'च्या खास मुलाखतीत केला खुलासा

T20 World Cup 2024: BCCI निवड समितीची जय शाह यांच्यासोबत अहमदाबादमध्ये बैठक! टीम इंडियाची घोषणा कधी? अपडेट्स आल्या समोर

Patanjali Products Ban: पतंजलीच्या 14 औषधांवर उत्तराखंडमध्ये बंदी! सुप्रीम कोर्टानं फटकारल्याचा परिणाम

Loksabha election 2024 : बेटों के सम्मान में, 'मर्द' उतरे मैदान मे! ना विजयाची चिंता ना प्रचाराची फिकीर; पुरुषांच्या हक्कासाठी निवडणुकीच्या मैदानात

Thomas Cup 2024: भारताचा पुरुष बॅडमिंटन संघ उपांत्यपूर्व फेरीत, इंग्लंडचा 5-0 ने उडवला धुव्वा

SCROLL FOR NEXT