Mobile thief Arrested in just 10 minutes Nashik News esakal
नाशिक

Crime Alert | अवघ्या 10 मिनिटात मोबाईल चोरटा गजाआड

कुणाल संत

नाशिक : गर्दीचा फायदा घेत वृद्धाचा मोबाईल चोरणारा चोरटा (mobile thief) हा परिसरात गस्त घालत असलेल्या पोलिसांनी अवघ्या दहा मिनिटांमध्ये पकडून त्यास अटक केली. याप्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली. या कामगिरीबद्दल पोलिस नाईक याचा वरिष्ठांकडून सत्कार करण्यात आला.

लामखेडे मळा (दिंडोरी रोड) येथे राहणारे सुरेश नाशिककर (७६) हे भाजीपाला खरेदी करण्यासाठी गुरुवारी (ता. १४) पंचवटी भाजी मार्केटमध्ये आले असता, गर्दीचा फायदा घेत मोबाईल चोरट्याने सुरेश नाशिककर यांचा महागडा मोबाईल चोरला. आपला मोबाईल चोरीला गेल्याचे कळताच त्यांनी या ठिकाणी गस्त घालत असलेले पोलिस नाईक आनंद गारे यांच्याकडे मोबाईल चोरीची तक्रार केली. या वेळी श्री. गारे यांनी तत्काळ गर्दीमध्ये संशयित फिरत असलेल्या एकास ताब्यात घेत त्याच्याकडे विचारपूस व त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे श्री. नाशिककर यांचा मोबाईल मिळून आला. श्री. गारे यांनी संशयित आकाश झुरडे (२२, रा. फुलेनगर) पंचवटी पोलिस ठाण्यात आणून त्याच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई केली.

अवघ्या दहा मिनिटांमध्ये पोलिस नाईक आनंद गारे यांनी मोबाईल चोरट्यास पकडल्याने वरिष्ठ पोलिस निरीक्षक डॉ. सीताराम कोल्हे यांनी श्री. गारे यांचा सत्कार केला. या वेळी पोलिस निरीक्षक रणजित नलवडे (प्रशासन), पोलिस निरीक्षक युवराज पत्की आदींसह सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी अभिनंदन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vietnam Boat Accident: व्हिएतनाम बोट दुर्घटनेत 15 भारतीयांचा मृत्यू; बोटीत असलेल्या 32 भारतीयांची नावं आली समोर

Pune News: कर्तव्य बजावणाऱ्या PSI ला दिलासा; पुण्यातील डेक्कन हॉटेल कारवाईप्रकरणी संदीप कदम यांचे निलंबन मागे

Karad Crime: कऱ्हाड शहर पोलिसांची दमदार कामगिरी! पिस्टल विक्रीस आलेल्या चौघांना अटक; चार देशी बनावटीचे पिस्टल, आठ जिवंत काडतुसे जप्त

MPSC Protest: विद्यार्थ्यांसोबत आजीही मैदानात! एमपीएससी आणि पोलिस भरतीसाठी संगमनेरमध्ये अनोखे आंदोलन, प्रांत कार्यालयासमोर ठिय्या

Ration Distribution: रेशनधारकांसाठी आनंदाची बातमी! ऑगस्ट ते ऑक्टोबरचे तीन महिन्यांचे धान्य एकाचवेळी मिळणार; वितरणात मोठा बदल

SCROLL FOR NEXT