mother and son died Sakal
नाशिक

अवघ्या चोवीस तासांत आईपाठोपाठ मुलाचाही मृत्यू

प्रशांत कोतकर

कोरोनाच्या महामारीत कुटुंबाची कुटंब उद्धवस्थ तर बालक निराधार होत असल्याचे चित्र सवरदूर बघावयास मिळत आहे. असाच एक दुर्देवी प्रसंग वडगाव (ता. मालेगाव) येथे घडला.

नाशिक : कोरोनाच्या महामारीत कुटुंबाची कुटंब उध्वस्त तर बालक निराधार होत असल्याचे चित्र सवरदूर बघावयास मिळत आहे. असाच एक दुर्देवी प्रसंग वडगाव (ता. मालेगाव) येथे घडला. मुलगा कोरोनाने उपचारार्थ दाखल असून अजून बरा होत नाही या चिंतेने स्वर्गवासी झालेल्या आईपाठोपाठ उपचारार्थ दाखल मुलाचाही चोवीस तासांच्या आत मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली. ग्रामस्थांनी एकत्रित येत अंत्यसंस्काराची तयारी केली. नातीने आजीला अग्निडाग दिला तर मुलाच्या शासकीय अंत्यसंस्काराचे सोपास्कार गावातील तरुणांनी मालेगाव येथे जात पूर्ण केले. (mother and son died due to corona in malegaoan taluka)

कुटुंबावर दुहेरी संकट

वडगाव येथील गंगुबाई रामचंद्र सोनवणे (वय ७५) यांचे कोरोनाने रविवारी (ता.३०) दुपारी दोन वाजता निधन झाले. त्यांच्यावर ग्रामस्थांच्या मदतीने अंत्यसंस्कार करण्यात आले. मयत गंगुबाई यांचा एकुलता एक मुलगा विनायक सोनवणे (वय ४५) यांना देखील कोरोनाची लागण झाल्याने मालेगाव येथील रुग्णालयात गेल्या पंधरा दिवसांपासून उपचार सुरू होते. त्यांना आईच्या निधनाची वार्ताही देण्यात आलेली नव्हती तरीही नियतीच्या मनात वेगळाच डाव होता. मुलगा विनायकची कोरोनाशी झुंज अपयशी ठरली अन्‌ त्याचाही मृत्यू झाला. आईच्या निधनाला चोवीस तास होत नाही व सोनवणे कुटुंबीय आईच्या निधनातून सावरत नाही, तोच सोमवारी (ता.३१) सकाळी सहा वाजता मुलाच्या निधनाची बातमी घरी येऊन धडकली. ऐनवेळी दुहेरी संकट काय करावे आणि काय करू नये, अशी विनायकची पत्नी रेखा व मुलगी प्रियाची यांची होती. या माय-लेकींची स्थिती बघून ग्रामस्थांनी मने अगदी सुन्न आणि नि:शब्द झाली होती. गावातील ज्येष्ठ व तरूणांनी एकत्रित येत गंगुबाई यांच्या अंत्यसंस्काराची तयारी केली. नात प्रिया हिने अग्निडाग दिला. तर विनायक यांच्या अंत्यसंस्काराचे सोपस्कार देखील ग्रामस्थांच्या मदतीने पार पडले.

निराधार झाली रेखा अन्‌ प्रिया

सासू व पतीच्या निधानाने विनायकची पत्नी रेखा व एकलुती एक मुलगी प्रिया हे निराधार झाले आहेत. या कुटुंबाला गरज आहे ती उभी राहण्याची व पुढील आयुष्य जगण्याासाठीच्या उभारीची. ग्रामस्थांनी सोपास्कार पार पडले. पुढे काय करावे, असा यक्ष प्रश्‍न सोनवणे माय-लेकी समोर उभा ठाकला आहे.

(mother and son died due to corona in malegaoan taluka)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hormuz Crisis: होर्मुजमध्ये २ जहाजांवर हल्ला, युद्धाची चाहूल! भारतीय टँकर्सनी घेतला यू-टर्न; ८.३ मिलियन बॅरल तेल अडकले

फलंदाजांना धडकी भरवणाऱ्या गोलंदाजाचा मृत्यूशी संघर्ष! ICU मधील त्याची अवस्था पाहून क्रिकेट विश्वात हळहळ...

Rahul Gandhi FIR प्रकरणात मोठा ट्विस्ट! हायकोर्टाने स्वतःचाच आदेश थांबवला, नेमकं काय घडलं?

RCB vs DC Live: टीम डेव्हिडचा पराक्रम, SIX पाहून भारी होती विराटची रिअ‍ॅक्शन; पण, कृणाल पांड्या का संतापला? Video Viral

Washing Machine Safety : वॉशिंग मशीन वापरताना अजिबात करू नका 'या' 2 चुका, नाहीतर घरात शॉर्टसर्किट होऊन लागू शकते आग

SCROLL FOR NEXT