crime news esakal
नाशिक

Nashik Crime News : जन्मदात्या आईचा दोघा मुलांकडून खून

सकाळ वृत्तसेवा

मालेगाव (जि. नाशिक) : दाभाडी (ता. मालेगाव) येथील गिसाका कॉलनी परिसरात जन्मदात्या आईचा दोघा मुलांनी शेतीच्या पैशांच्या वादातून नायलॉनच्या दोरीने गळा आवळून खून केला. सोमवारी (ता. ३०) रात्री हा प्रकार घडला. दहिदी येथील महिलेच्या खुनापाठोपाठ हा प्रकार घडल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे. (mother killed by her own two sons by farm land dispute Nashik Crime News)

हेही वाचा : 'पठाण'..आणि २०२३ मधले बाॅलीवूड..कसे असतील दिवस

गिसाका कॉलनीतील सुलकनबाई किसन सोनवणे (वय ७९, रा. गिसाका कॉलनी) या विधवा वृद्धेचा त्यांची मुले भगवान किसन सोनवणे (४५ वर्षे) व संदीप किसन सोनवणे (४२, दोघे रा. गिसाका कॉलनी) यांनी पैशाच्या वादातून जन्मदात्या आईचा नायलॉनच्या दोरीने गळा आवळून खून केला. यानंतर दोघांनी आईने आत्महत्या केल्याचा बनाव केला.

त्यांचे वडील किसन सोनवणे गिसाका कारखान्यावर पहारेकरी होते. वडीलांच्या मृत्यूनंतर सुलकनबाईने दोघा मुलांचे पालनपोषण केले होते. तथापि दोन्ही मुले मद्यपी होते. दारु पिल्यानंतर ते आईला वेळोवेळी मारहाण करीत होते.

यामुळे पोलिसांना संशय आला. पोलिसांनी दोघांची कसून चौकशी केली असता त्यांनी शेतीचे पैसे आई देत नसल्याने तिचा गळा आवळून खून केल्याची कबुली दिली. राहुल अशोक हिरे (४०) यांच्या तक्रारीवरुन दोघा मुलांविरुध्द आईचा खून केल्या प्रकरणी छावणी पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Monsoon Alert: मुंबईत ४.५ मीटरपेक्षा जास्त उंचीच्या लाटा २४ वेळा धडकणार! सर्वात मोठी भरती कधी येणार? मान्सूनसोबत हाय टाइडचाही धोका

Pune Vidhan Parishad Election: विधान परिषद निवडणुकीतून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाची माघार; 'या' कारणामुळे घेतला निर्णय

मच्छिंद्र कांबळी यांचं अजरामर 'वस्त्रहरण' नाटक पुन्हा भेटीला येणार; 'हा' कसलेला अभिनेता साकारणार तात्या सरपंच

Latest Marathi News Live Update : गडचिरोली प्रकल्पावरून आदित्य ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल

Smriti Mandhana: 'या' तारखेला रंगणार भारत पाकिस्तान हायव्होल्टेज सामना; त्याआधीच स्मृती मंधानाने चाहत्यांना केली मोठी विनंती, म्हणाली...

SCROLL FOR NEXT