नाशिक

गरबा विजेत्यांचा गौरव

CD
धुळे टुडे २ साठी... --- फोटो- NSK26H33108 धुळे : मुक्तेश्‍वर महादेव मंदिरासमोर गरबा नृत्यात सहभागी तरुणी, महिला. --- मुक्तेश्वर महादेव मंदिरात गरबा विजेत्यांचा गौरव --- नवरात्रोत्सवाची सांगता; नऊ ज्येष्ठ महिलांचा ‘नवदुर्गा’ म्हणून सन्मान सकाळ वृत्तसेवा धुळे, ता. २० : शहरातील चितोड रोड भागातील लीलाबाई चाळ स्मशानभूमीलगतच्या श्री मुक्तेश्वर महादेव मंदिर नवरात्रोत्सव समितीतर्फे नऊ दिवस गरबा आणि दांडियाचा उत्साह रंगला. शेकडो महिला व तरुणींनी यात सहभाग घेतला. सोमवारी (ता. १९) रात्री या नवरात्रोत्सवाची सांगता झाली. यावेळी विविध गरबा प्रकारांतील विजेत्यांना गृहोपयोगी वस्तू देऊन गौरविण्यात आले. तसेच, नऊ ज्येष्ठ महिलांचा साडी देवून ‘नवदुर्गा’ म्हणून त्यांचा सन्मान करण्यात आला. --- मंदिराचे संस्थापक मनोज गर्दे यांच्या उपस्थितीत आणि समितीच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते बक्षीस वितरण झाले. पारंपरिक वेशभूषा प्रकारात जान्हवी मोहिते, तेजस्विनी नरसिंगे, सृष्टी पवार, सपना काळे, श्रद्धा सोनवणे, शीतल महेंद्र देवरे, दिशा सोनार, सिद्धी हटकर आणि काजल सोनार यांना गौरविण्यात आले. तर उत्कृष्ट टिपरी प्रकारात मनीषा थोरात, हर्षदा भावसार, सायली पांचगे, रुचिता पाकळे, अश्विनी गायकवाड आणि लता गायकवाड यांनी बक्षिसे मिळविली. पहिल्यापासून शेवटपर्यंत गरबा, दोन टिपरी आणि बारा टिपरी प्रकारांत जया भोईटे, सोनाली वारेकर, उषा चव्हाण, वैशाली कुसळकर, मनीषा पाटील, सुजिता वाघ, तन्वी निकम आणि राणी मिस्तरी यांना गृहोपयोगी वस्तू देऊन सन्मानित करण्यात आले. संपूर्ण नवरात्रोत्सवात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलेला स्व. द्वारकाआई उत्तमराव गर्दे यांच्या स्मरणार्थ सन्मानचिन्ह देण्यात आले. समितीचे सहकार्य मंदिराचे संस्थापक श्री. गर्दे, मंदिराचे मुख्य पुजारी दिव्येश जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली हा नवरात्रोत्सव साजरा झाला. समिती अध्यक्ष कविता परदेशी, उपाध्यक्ष पूजा गर्दे व कोमल परदेशी, सचिव भारती भावसार, कोशाध्यक्ष शुभांगी पाटील यांनी नियोजन केले. गणेशोत्सव समितीचे अध्यक्ष भोला परदेशी, उपाध्यक्ष सुनील पाटील, दर्शन बागले, दिनेश निकम, भय्या परदेशी, रोहित गर्दे आणि समाधान पाकळे यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी सहकार्य केले. गरबा कार्यक्रमासाठी जितू मराठे यांनी ध्वनिसंयोजन केले. ---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कितीही दरोडेखोर आले तरी आमचा भगवा कोणीही चोरू शकत नाही; दसऱ्या मेळाव्यात उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

"आम्हाला पक्षाचे संख्याबळ वाढवून एकनाथ शिंदेंना पुन्हा सिंहासनावर बसवायचे आहे"; शिवसेनेच्या नेत्यांचे मोठे विधान!

रामराज्य म्हणजे नेमकं काय? विजयादशमीच्या भाषणात पंतप्रधान मोदींनी सांगितला अर्थ

टायगर श्रॉफ हल्ला प्रकरणात मोठा खुलासा! आधी दुसऱ्या सेलिब्रिटीला संपवण्याचा होता प्लॅन, चौकशीत काय समोर आलं?

Dussehra Shopping: आज दसरा ;वाहन, सोने, गृह, इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे खरेदीवर ग्राहकांचा भर १,२०० कोटींची उलाढाल अपेक्षित

SCROLL FOR NEXT