Smart School Scheme esakal
नाशिक

नाशिक : महापालिकेच्या 69 शाळा होणार स्मार्ट

विक्रांत मते

नाशिक : महापालिका शाळांमधील (NMC schools) विद्यार्थी खासगी शाळांमधील विद्यार्थ्यांच्या स्पर्धेत उतरण्यासाठी शाळांमध्ये तसे वातावरण निर्माण होणे गरजेचे आहे. त्यासाठी महापालिका एकूण १०१ शाळांपैकी ६९ शाळा स्मार्ट (Smart school) करणार आहे. पहिल्या टप्प्यामध्ये सहा विभागात प्रत्येकी एक स्मार्ट स्कूलची निर्मिती केली जाणार आहे. (Municipal Corporation 69 schools will be become smart Nashik news)

आधुनिक युगाशी स्पर्धा करण्यासाठी महापालिका शाळांमधील विद्यार्थी तयार होणे गरजेचे आहे. त्या अनुषंगाने धोरणात्मक परिवर्तन शिक्षण प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. यात शाळांचा दर्जा सुधारणे, विविध तंत्रांचा वापर करून मुलांना उत्तम दर्जाचे आधुनिक पद्धतीचे शिक्षण देणे, शिक्षकांना स्मार्ट क्लास रूमच्या माध्यमातून परस्पर संवादी तंत्रे, मल्टिमीडिया सामग्री वापरण्याचे प्रशिक्षण देऊन सक्षम केले जाणार आहे. महापालिकेच्या शिक्षण विभागाकडून ८८ प्राथमिक व तेरा माध्यमिक अशा एकूण १०१ शाळा चालविल्या जातात. या शाळांमध्ये विभागनिहाय एक याप्रमाणे प्रायोगिक तत्त्वावर सहा शाळांमध्ये स्मार्ट स्कूल प्रकल्प राबविला जाणार आहे.

त्यासाठी शिक्षक व विद्यार्थ्यांना प्रशिक्षित केले जात आहे. महापालिकेने त्यासाठी मेसर्स पॅलेडिअम कन्सल्टिंग इंडिया लिमिटेड या खासगी कन्सल्टन्सीची नियुक्ती केली आहे. कन्सल्टन्सीच्या माध्यमातून पालिकेच्या शाळांच्या शैक्षणिक दर्जा मध्ये सुधारणा करून सर्व शाळांचे टप्प्याटप्याने स्मार्ट स्कूल मध्ये रूपांतर केले जाणार आहे. स्मार्ट स्कूल उपक्रमांतर्गत खासगी शाळांप्रमाणेचं प्रत्येक शाळा वर्गात इंटरॅक्टिव्ह बोर्ड, संगणक, प्रोजेक्टर, सीसीटीव्ही राहणार आहेत. टॅबचा माध्यमातून डिजिटल हजेरी घेतली जाणार आहे. पाठ्यक्रम व शालेय साहित्य इ-कंटेंटच्या स्वरूपात दिली जाणार आहे. प्रत्येक स्मार्ट स्कूलमध्ये जापनीज तंत्रज्ञानाच्या मियावाकी फॉरेस्टची संकल्पना राबविली जाणार आहे.

प्रकल्पामध्ये महत्त्वाचे

- पायाभूत सुविधा मधील तफावत दूर करणे.

- शैक्षणिक दर्जा उंचावण्याचा दृष्टिकोन विकसित करणे.

- आयटी, इन्फ्रास्ट्रक्चर, आरोग्य, स्वच्छता, क्रीडा सुविधा.

- माहिती व तंत्रज्ञान पायाभूत सुविधा.

- आयसीटी उपकरण व संसाधन, अध्यापन पद्धती आदींचा अभ्यास.

- इन्फॉर्मेशन कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी विकसित करणे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Air Ambulance Crash: भीषण विमान दुर्घटना!,रांचीहून दिल्लीला निघालेली 'एअर अ‍ॅम्ब्यूलन्स' घनदाट जंगलात कोसळली

Team India Semi Final Scenario : टीम इंडियाला नेट रन रेट रडवणार! झिम्बाब्वेविरुद्ध ११ षटकं अन् विंडीजविरुद्ध १८३ धावांनी विजय... तिसरं समीकरणही लैय अवघड

Onion Rate Issue : कांदा उत्पादकांना एकरी ५० हजारांचा तोटा; शेतकऱ्यांत बाजारभावाअभावी चिंता, उत्पादन खर्च भागविण्याचाही प्रश्न

Bangladesh Politics : पंतप्रधान तारिक रहमान यांचा मोहम्मद युनूस यांना मोठा धक्का!

Yavatmal News : जिल्हा परिषद कर्मचार्‍यांच्या बदल्या एप्रिलमध्ये होणार; सीईओंचे गटविकास अधिकार्‍यांना पत्र

SCROLL FOR NEXT