murder esakal
नाशिक

Nashik Crime News : लग्नासाठी आलेल्या साडूचा खून; सराईत गुन्हेगार साडू संदीप निकाळेवर संशय

सकाळ वृत्तसेवा

Nashik Crime News : येथील स्टेशन परिसरात नातेवाईकाच्या लग्नासाठी टिटवाळा येथून आलेल्या एकाचा रविवारी (ता.१४) मध्यरात्री दीडच्या सुमारास सिन्नर फाटा येथे खून करण्यात आला. मागील भांडणाच्या वादातून हा खून झाल्याचा अंदाज आहे.

घोटी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अनिकेत शिंदे (२९) असे मृताचे नाव असून त्याचा साडू संदीप निकाळेवर संशय असून तो फरार आहे. (Murder of sadu came for marriage Suspect on criminal Sadu Sandeep Nikale Nashik Crime News)

अनिकेत नातेवाइकांकडे लग्नासाठी आला होता. लग्न आटोपून पुन्हा टिटवाळा येथे जायच्या तयारीत असताना अनिकेतचा मोठा साडू संदीप शांताराम निकाळे (रा. बदलापूर, जि. ठाणे) याने अनिकेत यास ‘तू माझी बाजू घेत नाही, माझ्या सासरची बाजू का बरं घेतो’ यावरून दोघांत वाद झाला.

यापूर्वीही अनेकदा वादविवाद झाले होते. रविवार मध्यरात्री संदीपने आपल्या सोबत विशाल शांताराम निकाळे (रा. बदलापूर), सागर सोनवणे (रा. गोंदेदुमाला), अमोल पवार (रा. कुऱ्हेगाव) यांना बोलविले. त्यांना अनिकेतला बोलविण्यास सांगितले.

अनिकेतला फोन लावून सिन्नर फाटा येथे तिघांनी बोलावून घेतले. त्यास सुरवातीला सासरची बाजू का घेतो? माझी बाजू का घेत नाही? म्हणत हातातील लाकडी दांडे, लोखंडी रॉड व लाथा बुक्यांनी बेदम मारहाण केली.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

त्यात अनिकेतच्या डोक्यास गंभीर जखम झाल्याने अतिरक्तस्राव झाला. तशाच स्थितीत त्याला रस्त्याच्या बाजूला टाकून ते सर्व जण फरार झाले. यानंतर अनिकेत याचे मेहुणे गणेश जगताप व सहकारी यांनी घोटी ग्रामीण रुग्णालय येथे अनिकेत यास आणले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

ही घटना समजताच लग्न सोहळ्यासाठी जमलेल्या नातेवाईकांनी रूग्णालयात गर्दी करत आक्रोश केला. संदीप निकाळे हा सराईत गुन्हेगार असून घटनेनंतर फरार झाला असून पोलिस तपास करत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sarvajan Pension Scheme: वृद्ध, विधवा अन् दिव्यांगांना दर महिन्याला थेट खात्यात पेन्शन; ‘सर्वजन पेन्शन योजने’साठी पात्रता काय?

Anganwadi Boxing: अंगणवाडीत बॉक्सिंगचे धडे! खेड्यातील चिमुकल्यांच्या डोळ्यात ऑलिम्पिकचे स्वप्न; महिला बॉक्सरच्या उपक्रमाची सर्वत्र चर्चा

Pension for Widows of Freedom Fighters: स्वातंत्र्यसैनिकांच्या विधवांनाही दरमहा २५ हजार पेन्शन; जाणून घ्या पात्रता अन् अर्ज प्रक्रिया

Nandini Krushak Samruddhi Yojana: गाई खरेदी अन् डेअरी व्यवसायासाठी ३१ लाखांपर्यंत सबसिडी; काय आहे 'नंदिनी कृषक समृद्धी योजना'?

Hair Growth Ladoo: दाट, लांबसडक आणि चमकदार केसांचे सिक्रेट; रोज सकाळी खा फक्त १ 'मॅजिक लाडू'!

SCROLL FOR NEXT