नाशिक

विद्यार्थीनी मृत्यूप्रकरणी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

CD
पान-१ मेन फोटो : 33398 नंदुरबार : जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शुक्रवारी करण्यात आलेल्या ठिय्या आंदोलनाप्रसंगी मोर्चेकऱ्यांसमोर भूमिका मांडतांना शानाभाऊ सोनवणे. फोटो : 33397 नंदुरबार : प्रांताधिकारी बंडू कापसे यांना निवेदन देताना शानाभाऊ सोनवणे, अनिल कोळी, सोनाली कोळी, घारू कोळी, दादा कोळी, राहुल कोळी आदी. ------------------ विद्यार्थिनी मृत्यूप्रकरणी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा निहारिकाच्या संशयास्पद मृत्यूच्या सखोल चौकशीची मागणी सकाळ वृत्तसेवा नंदुरबार, ता. २३ : जिल्ह्यातील अक्कलकुवा येथील पीएम श्री जवाहर नवोदय विद्यालयाची विद्यार्थिनी निहारिका अनिल कोळी हिच्या मृत्यूप्रकरणी दोषींवर कठोर कारवाई व्हावी, या मागणीसाठी शुक्रवारी (ता. २३) जिल्हाधिकारी कार्यालयावर आदिवासी टोकरे कोळी, महादेव कोळी व मल्हार कोळी समाजातर्फे निषेध मोर्चा काढण्यात आला. समाजाचे नेते शानाभाऊ सोनवणे यांनी नेतृत्व केले. मोर्चात जिल्ह्यातील समाजबांधव व सर्वपक्षीय पदाधिकारी सहभागी झाले होते. ................ मोर्चेकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दोन तास ठिय्या आंदोलन केले. या वेळी प्रांतधिकारी बंडू कापसे यांनी आंदोलनस्थळी येऊन मोर्चेकऱ्यांशी चर्चा केली. मोर्चेकऱ्यांतर्फे त्यांना निवेदन देण्यात आले. शहरातील महाराणा प्रताप यांच्या पुतळ्यापासून सुरू झालेला हा मोर्चा नवापूर चौफुलीमार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचला. मोर्चेकऱ्यांच्या हाती विविध मागण्यांचे फलक होते. विद्यार्थिनीच्या मृत्यूची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली. मोर्चात महिलांचा सहभाग लक्षणीय होता. निहारिकाचे वडील अनिल कोळी, आई सोनाली कोळी यांच्यासह कोळी समाजाचे नेते शानाभाऊ सोनवणे, रील कलाकार भूषण गिरासे, घारू कोळी, दादा कोळी, राहुल कोळी, हेमंत कोळी, कृष्णा निकम, कविता कोळी, गीतांजली कोळी, नामदेव येळवे, गणेश कोळी, हिंमत निकुम, पवन सोनवणे, संदीप बागूल, दिनेश सोनवणे, विनायक कोळी, राहुल ईशी, नीलेश शिंदे, आनंद कोळी, शरद कोळी, विजय कोळी, पंकज कोळी, आप्पा कोळी, बबलू कोळी, साहेबराव कोळी, वसंत कोळी, किशन शिरसाठ, वाल्मीक कोळी, सुरेश कोळी, रितेश कोळी, समाधान कोळी, राकेश कुंवर, जितेंद्र पाटील, मंगेश कोळी, प्रकाश शिरसाठ, वसंत वाघ, सौरभ कोळी, गोपाल राजपूत आदींसह समाजबांधव व परिसरातील सर्वपक्षीय समाजबांधव उपस्थित होते. नंदुरबार जिल्हा शिवसेना (उबाठा) जिल्हाप्रमुख पंडित माळी, शिवसैनिक छोटू पाटील, नंदकिशोर पाटील, मनोहर राजपूत, आर. आर. पाटील, चंद्रसिंग ठाकूर यांनी मोर्चाला पाठिंबा दिला. ----------------------------- चौकट २७ ऑक्टोबरला बैठक दरम्यान, प्रांताधिकारी बंडू कापसे यांनी आंदोलनस्थळाहून मोबाईलवरून जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा केली. मंगळवारी (ता. २७) दुपारी तीनला जिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीत याप्रकरणी बैठक होणार असल्याची माहिती कापसे यांनी दिली. या घटनेची उपविभागीय अधिकारी स्तरावर चौकशी सुरू असून, याबाबतचा चौकशी अहवाल प्राप्त झाल्यानंतर संबंधितांवर कारवाई केली जाईल, असे आश्‍वासन प्रांताधिकाऱ्यांनी दिले. -------------------- मोर्चातील प्रमुख मागण्या निहारिका कोळीच्या मृत्यूची उच्चस्तरीय, निष्पक्ष, सखोल चौकशी व्हावी चौकशीतील दोषी व्यक्तींवर कठोर कारवाई करावी शासकीय, अनुदानित तसेच नवोदय वसतिगृहांची तपासणी करावी निहारिकाच्या कुटुंबास शासनाकडून आर्थिक मदत द्यावी अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी वसतिगृहांतील व्यवस्थेचे परीक्षण करावे

Pune Crime : इन्स्टाग्रामवरील व्हिडिओच्या वादातून नववीतील विद्यार्थिनीवर चाकू हल्ला; बावधन परिसरातील शाळेतील घटना

बुध वक्री होताच वृषभसह ६ राशींच्या अडचणी वाढणार; व्यवसायाबाबत निर्णय घेताना सावधगिरी गरजेची

Anjali Arora controversial exit : ३ लाख रुपये घेतले अन् १२ व्या मिनिटाला स्टेजवरून पळाली; अंजली अरोराच्या 'त्या' नखऱ्यांमुळे आयोजकांचा मोठा दणका!

IMD weather forecast 24 October : २४ ऑक्टोबरला देशातील हवामानात मोठा उलटफेर; गुलाबी थंडी वाढणार की पावसाची एन्ट्री? पाहा हवामानाचा नवा अंदाज!

शिवरायांच्या स्वराज्याची शान! महाराष्ट्रातील ‘या’ 5 किल्ल्यांना एकदा तरी भेट द्याच

SCROLL FOR NEXT