नाशिक

जिल्ह्यातील ‘नांदी संमेलने’ लांबणीवर

CD
पान-२ ॲंकर ----------- ३६-४ जिल्ह्यातील तिन्ही ‘नांदी संमेलने’ लांबणीवर ----------- आयोजनाबाबत संभ्रम, नियोजनाचा अभाव, दुष्काळामुळे काटकसर ------------- दीपिका वाघ : सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता.१८ : शंभराव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या पार्श्वभूमीवर राज्य, देशपातळीवर तसेच परदेशात एकूण ९९ ‘नांदी संमेलने’ आयोजित करण्यात आली आहेत. मात्र, जिल्ह्यातील नियोजित संमेलनाची वेळ लांबणीवर पडली असून, नियोजनाबाबत कोणतीही स्पष्टता नाही. अवघ्या दोन आठवड्यांवर येऊन ठेपलेल्या नांदी संमेलनाच्या नियोजनाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. -------------- नाशिक आणि निफाड येथील नांदी संमेलन १ नोव्हेंबर, तर मालेगावात २ नोव्हेंबरला निश्चित करण्यात आले आहे. असे असताना अद्याप या संमेलनांच्या आयोजक संस्था आणि नियोजनाबाबत कोणतीही हालचाल झालेली नाही. विशेष म्हणजे महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या जिल्हा प्रतिनिधींनाही याबाबत कोणतीही अधिकृत सूचना मिळालेली नाही. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकचे संमेलन संत साहित्य व अध्यात्म याविषयावर मालेगाव येथील संमेलन ‘गझल’ विषयावर होणार आहे. जुलैमध्ये पुण्यात झालेल्या जिल्हा प्रतिनिधींच्या बैठकीत संमेलनातील ६५ विषयांच्या याद्या व तारखा निश्चित करण्यात आल्या. संमेलनाची रूपरेषा ठरविल्यानंतर मुख्य शाखेच्या परवानगीनंतर संमेलनाची कार्यक्रमपत्रिका जाहीर केली जाणार होती. मात्र त्यानंतर अद्याप पुढे काहीही हालचाल झालेली नाही. दरम्यान, मसापचे कोशाध्यक्ष प्रदीप निफाडकर यांनी शुक्रवारी निफाडला भेट देत संमेलनाबाबत चर्चा केली. त्यानुसार निफाडचे नांदी संमेलन आता १ नोव्हेंबरऐवजी १२ डिसेंबरला ‘कृषी’ याविषयावर होणार आहे. त्याचे नियोजन वैनतेय विद्यालयाचे माजी प्राचार्य वि. दा. व्यवहारे करीत आहेत. ----- ९९ पैकी आजअखेर १३ च संमेलन पुण्यात १४ ऑगस्टला झालेल्या पहिल्या नांदी संमेलनाने या मालिकेची सुरुवात झाली. १५ जानेवारी २०२७ ला औंदुबर येथे समारोप होईल. शंभरावे मुख्य साहित्य संमेलन २८ ते ३१ जानेवारीदरम्यान पुणे विद्यापीठाच्या प्रांगणात होणार आहे. मात्र, आत्तापर्यंत केवळ १३ नांदी संमेलने पार पडल्यामुळे उर्वरित ८६ संमेलने कशी पार पडणार, असा प्रश्न आता उभा ठाकला आहे. नाशिकमधील नांदी संमेलन मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेच्या प्रांगणात घेण्याचा विचार होता. परंतु याबाबत कोणतीही माहिती अद्याप आलेली नसल्याची माहिती ‘मविप्र’चे सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे यांनी दिली. ------- १६-१ संमेलनावर दुष्काळाचे सावट सुरुवातीला दोन दिवसांचे संमेलन आधी दीड दिवस, नंतर एक दिवस आणि आता थेट ‘अर्ध्या दिवसावर’ घेण्याचे सांगण्यात आले. त्यातच ग्रंथदिंडी काढू नका आणि जेवणावळ ठेवू नका, अशा सूचना महामंडळाच्या अध्यक्षांनी दिल्या आहेत. राज्यात दुष्काळी परिस्थिती असल्याने मुख्य संमेलनासह नांदी संमेलनात काटकसरीने निधी खर्च केला जाणार आहे. -------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gokul Election Voting Percentage : गोकुळसाठी ९९.९६ % मतदान; सतेज पाटील, हसन मुश्रीफांची प्रतिष्ठा पणाला, उद्या मतमोजणी, कोण मारणार बाजी?, तालुका निहाय आकडेवारी

Gokul Milk Union Election 2026 : गोकुळच्या मतदान केंद्रावर सुरक्षा व्यवस्थेचे तीनतेरा; मतपत्रीकेचे फोटो व्हायरल, नजर चुकवून मोबाईलवर काढले फोटो

Tukaram Munde Viral Video : तुकाराम मुंढेंचा VIDEO व्हायरल; ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्याच्या मागणीशी संबंध काय?

मुंबईत नोकरी मिळाली, जॉइनिंग करण्याआधीच आक्रीत घडलं, २३ वर्षीय तरुणीला नराधमाने संपवलं, पुलावरून ओढत नेत...; कुडाळमध्ये काय घडलं?

Latest Marathi News Live Update : जळगावच्या कुंभारीत पोलीस प्रशिक्षण केंद्र, जामनेरमध्ये मुलींचे वसतिगृह; मंत्री अशोक उइके यांची घोषणा

SCROLL FOR NEXT