नाशिक

आदिवासी अनुदानित आश्रम शाळांच्या संस्थाचालकांची बैठक

CD
(टुडे पान एक मेन) फोटो : NSK26H33226 नंदुरबार : आश्रमशाळा संचालकांच्या बैठकीस उपस्थित आमदार चंद्रकांत रघुवंशी, ॲड. के. सी. पाडवी, चंद्रकांत पवार, लागिमा तिवारी, युवराज पाटील, कांतीलाल टाटीया आदी. ---------------- आश्रमशाळांना गॅस सिलिंडर घरगुती दराने द्यावा संस्थाचालकांनी बैठकीत आश्रमशाळांच्या समस्यांचा वाचला पाढा सकाळ वृत्तसेवा नंदुरबार, ता. २१ : आश्रमशाळांना घरगुती दराने गॅस सिलिंडर उपलब्ध करून द्यावा. तसेच, मागणीप्रमाणे रेशनचा नियमित पुरवठा होण्यासाठी पाठपुरावा करण्यात यावा, अशी मागणी अनुदानीत आश्रमशाळा संस्थाचालकांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत केली. नंदुरबार व तळोदा आदिवासी प्रकल्पांतर्गत असलेल्या अनुदानित आदिवासी आश्रमशाळा संस्थाचालकांची विविध प्रश्नांसंबंधी जिल्हाधिकारी कार्यालयात बुधवारी (ता. २१) बैठक झाली. संघटनेचे अध्यक्ष आमदार चंद्रकांत रघुवंशी, माजी आदिवासी विकासमंत्री ॲड. के. सी. पाडवी यांच्यासह आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाचे चंद्रकांत पवार, तळोदा प्रकल्प अधिकारी लागिमा तिवारी आदी उपस्थित होते. अनुदानित आश्रमशाळांमध्ये होणाऱ्या विद्यार्थी मृत्यूप्रकरणी मुख्याध्यापक, अधीक्षक व संस्थाचालकांच्यावर स्थिर गुन्हा दाखल करण्यात येऊ नये. अनधिकृत व्यक्ती अथवा काही संघटनेचे पदाधिकारी हे वरिष्ठांच्या परवानगीशिवाय आश्रमशाळेत विद्यार्थ्यांची मुलाखत घेणे, व्हिडिओ काढणे, शालेय कामकाजात अडथळा आणणे, विद्यार्थी व कर्मचारी यांना भडकविणे हे प्रकार करीत असतात. यामुळे आश्रमशाळा चालविणे कठीण होत आहे. अशा परिस्थितीत प्रकल्प अधिकाऱ्यांनी आदेश काढावेत. तसेच, आश्रमशाळांना घरगुती दराने गॅस सिलिंडर उपलब्ध करून द्यावा. मागणीप्रमाणे रेशनचा नियमित पुरवठा होण्यासाठी पुरवठा अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा करावा. प्रकल्पस्तरीय ‘माझी शाळा, सुंदर शाळा’ तसेच ‘विज्ञान प्रदर्शन’ या विषयावर अनुदानित आश्रमशाळांची स्पर्धा घेऊन त्यातील विजेत्या स्पर्धकांना जिल्हा नियोजनाच्या टीएसपी अनुदानातून पुरस्कार द्यावा. पुरस्कारप्राप्त विद्यार्थ्यांसाठी इस्त्रो सहलीचे आयोजन करावे, अशा मागण्या या वेळी करण्यात आल्या. सर्पदंश प्रतिबंधक लस उपलब्ध करावी अनुदानित आश्रमशाळेच्या विकासासाठी अंतर्गत रस्ते, पाणीपुरवठा, स्ट्रीट लाईट यासाठी निधी उपलब्ध करून द्यावा. जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांकडे अनुदानित आश्रमशाळेसाठी क्रीडांगण विकासच्या प्रलंबित प्रस्तावास विशेष बाब म्हणून मान्यता द्यावी. प्रत्येक आश्रमशाळेत जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांमार्फत वैद्यकीय औषधोपचार, किड्स नियमित उपलब्ध करून द्यावे. सर्पदंश प्रतिबंधक लस आवश्यक प्रमाणात आश्रमशाळा परिसरातील सर्व ग्रामीण रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्रांना उपलब्ध करून देण्याची मागणी या वेळी करण्यात आली. रिक्त पदे तत्काळ भरावीत प्रत्येक अनुदानित आश्रम शाळांमध्ये कोट गादी, आवश्यक संडास- बाथरूम, आरओ आदी व्यवस्था पूर्ण करण्यासाठी काही कालावधी देण्याबाबत चर्चा करण्यात आली. याबाबत प्रकल्प अधिकारी श्री. पवार, श्रीमती तिवारी यांनी सकारात्मक कार्यवाही करणार असल्याचे सांगितले. त्याचप्रमाणे आश्रमशाळांमधील वर्ग चार पदे बाह्य स्तोत्रातून न भरता नियमित स्वरूपात भरण्याबाबत शासनाकडे पाठपुरावा करावा. तोपर्यंत रिक्त पदे बाह्य स्त्रोतामार्फत तत्काळ प्रकल्प अधिकाऱ्यांमार्फत उपलब्ध करून द्यावा. नर्स, परिचारिका, कला, क्रीडा व संगणक शिक्षक देखील बाह्यस्त्रोत कर्मचारी नेमणुका प्रकल्प अधिकाऱ्यांमार्फत उपलब्ध करून देण्याबाबत मागणी करण्यात आली. सफाईगार कामगारांची भरती करावी सफाईगार हे फक्त एकच पद देण्यात आलेले आहे. त्याऐवजी सफाईगार एक महिला व एक पुरुष कर्मचारी असणे आवश्यक आहे. या प्रश्‍नांबाबत प्रकल्प अधिकाऱ्यांनी संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळविण्याबाबत संस्थाचालक संघटनेचे अध्यक्ष श्री. रघुवंशी यांनी सुचवले. या बैठकीला संस्था चालक संघटनेचे सचिव युवराज पाटील, कांतीलाल टाटीया, शशिकांत वाणी, राजेंद्रकुमार गावित, सुहास नदावटकर संजय जाधव, पुष्पेंद्र रघुवंशी, अविनाश पवार, अजित नाईक, तानाजी वळवी, उर्मिला गावित, आशा पाडवी, निमेश पवार, यशपाल पटेल, मुकेश पराडके, किरण वळवी आदी संस्थाचालक उपस्थित होते. सहायक प्रकल्प अधिकारी नंदकुमार साबळे, बबन मुंगळे, ज्ञानेश्वर माळी, प्रमोद मालवीय आदी आदिवासी विकास विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Elon Musk: अंतराळात डेटा सेंटर, जमिनीवर एआयचा विस्तार! काय आहे एलॉन मस्क यांचा जगाला धडकी भरविणारा मास्टर प्लॅन?

आमचे हात बांधलेले नाहीत, निवडणूक प्रक्रियेत गडबड केल्यास शांत बसणार नाही, सर्वोच्च न्यायालयाची मोठी टिप्पणी!

Soybean Farm Fire : दुष्काळात कष्टाने जगवलेले पाच एकरवरील सोयाबीन जळून खाक; जाणीवपूर्वक आग लावल्याचा शेतकऱ्याचा संशय

Latest Marathi News Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

अमरावतीत पोलीस शिपायाच्या मृत्यूने खळबळ; टोकाचं पाऊल उचलण्यापूर्वी लिहिली चिठ्ठी, नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT