नाशिक

साक्रीत पाटील महाविद्यालयात नंदुरबार विभागीय अंतर महाविद्यालयीन कबड्डी स्पर्धा

CD
MSI26B09743 साक्री : नंदुरबार विभागीय आंतर महाविद्यालयीन कबड्डी स्पर्धेचे उद्‌घाटन करताना विद्यापीठाचे अधिसभा सदस्य डॉ. संदीप नेरकर. शेजारी प्राचार्य डॉ. अनंत पाटील. --------------------- मैदानी खेळाच्या माध्यमातून व्यक्तिमत्व विकास डॉ. संदीप नेरकर : साक्रीत आंतर महाविद्यालयीन कबड्डी स्पर्धा सकाळ वृत्तसेवा म्हसदी, ता. १५ : विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी खेळ अनिवार्य बाब असून, त्यातून विद्यार्थ्यांचा शारीरिक व मानसिक विकास साध्य करता येतो. खेळामुळे विद्यार्थ्यांमध्ये शिस्त व आत्मविश्वास तसेच संघभावना यासारखे गुण अधिक वृद्धिंगत होतात. त्याचबरोबर मैदानी खेळाच्या माध्यमातून एक सुदृढ, सक्षम व्यक्तिमत्त्व तयार होण्यास मदत होत असल्याचे मत कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे अधिसभा सदस्य डॉ. संदीप नेरकर यांनी व्यक्त केले. साक्रीत विद्या विकास मंडळाच्या सीताराम गोविंद पाटील कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात नंदुरबार विभागीय आंतर महाविद्यालयीन कबड्डी स्पर्धेच्या उद्‌घाटनप्रसंगी ते बोलत होते. प्राचार्य डॉ. अनंत पाटील अध्यक्षस्थानी होते. अमळनेर येथील प्रताप महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. डॉ. योगेश तोरवणे, भालचंद्र मोरे, क्रीडा संचालक डॉ. राजेश सोनवणे, उपप्राचार्य प्रा. डॉ. ज्ञानेश्वर चव्हाण, डॉ. हसिनखॉं तडवी, डॉ. जगदीश तोरवणे उपस्थित होते. प्राचार्य डॉ. अनंत पाटील यांनी विद्यार्थ्यांना खेळाडू वृत्तीने स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन केले. पंच म्हणून नरेंद्र नगराळे, कबीर कुरेशी, दानिश शेख, प्रतीक घटि, पुष्केश श्रीखंडे व भूषण बोरसे यांनी काम पाहिले. डॉ. हसिनखॉं तडवी यांनी प्रास्ताविक केले. डॉ. भूषण अहिरराव यांनी सूत्रसंचालन केले. नंदुरबार विभागातून एकूण दहा पुरुष संघ व पाच महिला संघ स्पर्धेत सहभागी झाले होते. -------- विजयी संघ असे पुरुष स्पर्धेत वसंतराव नाईक महाविद्यालय विजयी, सी. गो. पाटील महाविद्यालयाचा संघ उपविजयी, तर बामखेडा येथील कला महाविद्यालयाच्या संघाने तृतीय स्थान प्राप्त केले. महिला स्पर्धेत वसंतराव नाईक महाविद्यालय विजयी, नंदुरबार येथील जी. टी. पाटील महाविद्यालय उपविजयी, तर सी. गो. पाटील महाविद्यालयाच्या संघाने तृतीय स्थान प्राप्त केले. नंदुरबार विभागीय आंतर महाविद्यालय कबड्डी स्पर्धेत विविध महाविद्यालयातील १४० विद्यार्थी व ७० विद्यार्थिनींनी खेळाडूंनी सक्रिय सहभाग नोंदविला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana Akole Protest : लाडक्या बहिणी रस्त्यावर! KYC च्या नावाखाली अनुदान बंद केल्याचा आरोप करत वर्षा बंगल्यावर धडक देण्याचा इशारा, सरकारला अल्टिमेटम

Yogi Adityanath: मुलींचा शाळा सोडण्याचा दर २० टक्क्यांवरून ३ टक्क्यांखाली? योगी सरकारचा शिक्षणातील बदलाचा दावा

Amravati Teacher Constituency Election: बच्चू कडूंचं मतांच्या गणितावर भाष्य

Latest Marathi News Update : संजय राऊत मातोश्री ऐवजी थेट शिवतीर्थावर, राज ठाकरेंच्या भेटीत काय घडलं

सुप्रीम कोर्टाची ज्ञानेश कुमारांना नोटीस, तर राहुल गांधींनाही फटकारलं; SIR प्रकरणी याचिकेवर सुनावणी

SCROLL FOR NEXT