पान एक ॲंकर
32469
नंदुरबार : विकास शिखर परिषदेबाबत माहिती देताना ‘योजक’चे प्रमुख डॉ. गजानन डांगे समवेत
---------------------------
डिसेंबरमध्ये नंदुरबारमध्ये जिल्हा विकास शिखर परिषद
‘योजक’ संस्थेचा पुढाकार ; ''ई'' कचरा संकलनाचाही प्रयोग राबविणार
सकाळ वृत्तसेवा
नंदुरबार : जिल्ह्याच्या सर्वांगीण आणि शाश्वत विकासासाठी डिसेंबरमध्ये ''नंदुरबार विकास शिखर परिषद’ आयोजित करण्यात आली आहे. सामाजिक विकासात योगदान देणारी ‘योजक’ आणि ‘एनडीडीसी’ या संस्थांतर्फे ही परिषद होणार आहे. त्याचप्रमाणे नंदुरबार जिल्ह्यात ''ई'' कचरा संकलनाचा उपक्रम देखील हाती घेण्यात येणार असल्याची माहिती ‘योजक’ संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. गजानन डांगे यांनी दिली.
पत्रकारांशी संवाद साधताना डॉ. डांगे म्हणाले, की जिल्ह्यातील प्रमुख चार पिकांसंदर्भात अभ्यासपूर्वक नियोजन करण्यात येत आहे. वनविभागाने गावाला दिलेल्या जमिनींवर जंगल उभारणीच्या कार्यात योजक संस्था मदत करणार आहे. ‘योजक’ ही भारतीय विकास चिंतनावर आधारित विचारधारेने काम करणारी संस्था आहे. तर ‘एनडीडीसी’ हा मंच नंदुरबार जिल्ह्याच्या विकासासाठी स्थापन करण्यात आला असून नागरिकांच्या सहभागातून विविध उपक्रम राबविण्याचा मानस आहे. हा मंच शेतकरी, समुदाय, व्यावसायिक, शैक्षणिक संस्था, उद्योग, सामाजिक संस्था आणि प्रशासन यांना एकत्र आणण्याचे काम विकास शिखर परिषदेच्या माध्यमातून होणार आहे. यासाठी संस्थेतर्फे उद्योग सर्वेक्षण करण्यात आले आहे.
यावेळी डॉ. रोशन भंडारी, आशिष वाणी, रामसिंग वळवी, यशपाल पाटील, योजकच्या उपाध्यक्षा अक्षया आपटे, रिड भारतच्या जुई पेठे यावेळी उपस्थित होत्या.
परिषदेच्या ‘लोगो’तून नंदुरबारची ओळख
विकास शिखर परिषदेचा लोगो तयार करण्यात आला असून ते नंदुरबारच्या ओळखीचे प्रतीक आहे. लोगोतील तापी खोरे हे सुपीकता आणि समृद्धीचे प्रतीक आहे. तर नर्मदा खोरे हे डोंगराळ भाग आणि संस्कृतीचे दर्शन घडविते. सातपुडा-सह्याद्री हा विकासाचा भक्कम आधार दर्शविण्याचे काम करतो. ''नं'' हे अक्षर नंदुरबारची ओळख आणि कृषिप्रधान ग्रामीण अर्थव्यवस्थेचे प्रतीक असून दाखविण्यात आलेला षटकोन हा जिल्ह्यातील सहा तालुके आणि जनतेच्या सामर्थ्याचा प्रतीक आहे. पूर्व-परिषद जनसंवाद, तज्ज्ञ सल्लामसलत आणि मार्गदर्शक दस्तऐवज तयार करणे हे उपक्रम परिषदेची रचना निश्चित करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
‘नंदुरबार २०५०'' संकल्पना
२०२३ मध्ये शेतकरी, विविध क्षेत्रातील तज्ज्ञ आणि विकास कार्यकर्त्यांना एकत्र आणून जिल्ह्याच्या भविष्याचे व्हीजन मांडण्यात आले होते. तीन दिवसीय विकास शिखर परिषदेचा मुख्य उद्देश जन-चेतनेपासून जन-आधारित विकासाकडे, दृष्टीपासून कृतीकडे आणि आकांक्षी जिल्ह्यापासून प्रगतिशील जिल्ह्याकडे प्रवास करणे असा आहे. यात कृषी आणि नैसर्गिक संसाधन व्यवस्थापन, पर्यावरण, उद्योग आणि उद्योजकता, आदिवासी व ग्रामीण विकास, सामाजिक संरक्षण, मानव विकास, नागरीकरण आणि शासन या विषयांवरही चर्चा होणार असल्याची माहिती डॉ. डांगे यांनी यावेळी दिली.
अशी असेल ई- कचरा मोहीम
योजक संस्थेतर्फे संपूर्ण नंदुरबार जिल्ह्यात ई-कचरा संकलन मोहीम राबविण्यात येणार आहे. यात प्रत्येक घरातील निरुपयोगी व खराब होऊन झालेल्या इलेक्ट्रीक वस्तू गोळा केल्या जाणार आहे. खराब होऊन घरात पडलेल्या आहेत.