नाशिक

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसह वनहक्क दावेदारांना तातडीची भरपाई द्यावी

CD
पान-४ मेन फोटो : 33364 नंदुरबार : जिल्हाधिकारी कार्यालयावर शुक्रवारी काढण्यात आलेला मोर्चा. फोटो : 33365 नंदुरबार ः निवासी उपजिल्हाधिकारी आशा संघवी यांना निवेदन देताना आर. टी. गावित, विक्रम गावित, शीतल गावित, मनिलाताई गावित, सुरेखा पाडवी, देऊबाई वळवी, मनोहर वळवी, रवी वळवी, बाबूराव ठाकरे, चिंतामण पाडवी आदी. --------------------------- सत्यशोधक कम्युनिस्ट पक्षाचा नंदुरबारला मोर्चा वनहक्क दावेदारांना तातडीची नुकसानभरपाई देण्याची मागणी नंदुरबार, ता. २३ : नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसह वनहक्क दावेदारांना तातडीची भरपाई द्यावी यांसह विविध मागण्यांसाठी सत्यशोधक कम्युनिस्ट पक्षाच्या नेतृत्वाखाली सत्यशोधक शेतकरी सभा व सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी सभेतर्फे शुक्रवारी (ता. २३) जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. या वेळी मतदारयादीच्या विशेष सखोल पुनरीक्षणाच्या प्रक्रियेलाही विरोध करण्यात आला. मोर्चानंतर निवासी उपजिल्हाधिकारी आशा संघवी यांना निवेदन देण्यात आले. मागण्यांची अंमलबजावणी न झाल्यास २६ नोव्हेंबरपासून नाशिक ते मुंबई पायी बिऱ्हाड महामोर्चा काढण्याचा इशारा संघटनेने दिला. ....... निवेदनाचा आशय असा ः दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना व सर्व प्रलंबित वनहक्कधारकांना एकरी २५ हजार रुपये नुकसानभरपाई द्यावी,. भूमिहीन शेतमजूर व ग्रामीण कष्टकऱ्यांना दरमहा ५००० हजार रुपये जीवननिर्वाह अनुदान द्यावे. जिल्हास्तरीय वनहक्क समितीने फेटाळलेल्या दाव्यांसह प्रलंबित वनहक्क दाव्यांचा निपटारा करण्यासाठी स्थळ पाहणी करावी. जीपीएस मोजणी करण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम जाहीर करून सातबारा उतारा द्यावा. मालकी हक्क सातबारा उतारा द्यावा आदी मागण्या या वेळी करण्यात आल्या. पावसाचा खंड पडल्यामुळे सोयाबीन, भात, कपाशी व तुरीचे नुकसान झाले असून, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना, वनहक्क दावेदारांना तातडीने भरपाई द्यावी. वनहक्कधारकांना सातबारा उतारा व फार्मर आयडी उपलब्ध करून द्यावा. पाणीटंचाई, शेतीपंपांचा वीजपुरवठा, कर्जमुक्ती, हमीभाव आणि रोजगार हमीची कामे याबाबत उपाययोजना कराव्यात, अशी मागणी करण्यात आली. तसेच आदिवासी वसतिगृहांचे प्रश्न सोडवावेत. आरोग्य सुविधा उपलब्ध कराव्यात. घरकुलांचे प्रलंबित अनुदान वितरित करावे. पात्र नागरिकांची नावे मतदारयादीतून वगळली जाऊ नयेत. बिरसा मुंडा योजनेंतर्गत कामे पूर्ण झालेल्या मंजूर विहीरींचे अनुदान द्यावे, अशा मागणी करण्यात आल्या. दरम्यान, मोर्चाची सुरुवात नवापूर येथून झाली. हा मोर्चा आज जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. या वेळी विविध मागण्यांच्या घोषणा देत शासनाचे लक्ष वेधण्यात आले. आर. टी. गावित, विक्रम गावित, शीतल गावित, मनिलाताई गावित, सुरेखा पाडवी, देऊबाई वळवी, मनोहर वळवी, रवी वळवी, बाबूराव ठाकरे, चिंतामण पाडवी, काशीनाथ कोकणी, किसू वळवी, सेल्या गावित, मंगल वळवी, ईश्वर वळवी, अरुण वळवी, दिवाणजी नाईक, उत्तम गावित, सेल्या गावित, रेहमू गावित यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते हातात लाल झेंडा घेऊन भरउन्हात सहभागी झाले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND W vs ZIM W: श्री चरणीची भेदक गोलंदाजी; झिम्बाब्वेचा डाव आटोपला, भारतासमोर किती धावांचं लक्ष्य?

Baramati News : निवडणूक पदवीधरची....बारामतीचे राजकारण ढवळून निघाले...

Marathi News Live Updates: FDA चा औषध विक्रेत्यांना दणका; राज्यात २९ परवाने रद्द, ७१ निलंबित

Shri Someshwar Sugar Factory : सोमेश्वरच्या सभासद-कामगारांची दिवाळी झाली गोड! 90 कोटींच्या रकमा खात्यावर वर्ग; सभासदांना उर्वरित बिल तर कामगारांना बोनस जमा

Pune News : दिवाळीत फटाके उडविताना घ्या खबरदारी; अग्निशामक दलाकडून सुरक्षिततेची नियमावली

SCROLL FOR NEXT