नाशिक

२५३ कुटुंबांना घरकुलांचे वाटप

CD
33487 नंदुरबार : येथील श्री. छत्रपती शिवाजी महाराज नाट्यमंदिरात घरकुलांसाठी बालकांच्या हस्ते सोडत काढताना आमदार चंद्रकांत रघुवंशी, नगराध्यक्षा रत्ना रघुवंशी, प्रथमेश चौधरी, प्रांताधिकारी बी.ए.कापसे, मुख्याधिकारी राहुल वाघ. ------------- नंदूरबारला २५३ पात्र कुटुंबांना घरकुलांचे वाटप सकाळ वृत्तसेवा नंदुरबार, ता. २४ : नगरपरिषदेतर्फे प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत ''बेघरांसाठी घरे'' या घटकातून २५३ पात्र कुटुंबांना घरकुलांचे वाटप करण्यात आले. शनिवारी (ता.२४) श्री. छत्रपती शिवाजी महाराज नाट्यमंदिरात यासाठी जाहीर सोडत काढून एकुण ७११ पात्र लाभार्थ्यांमधून २५३ कुटुंबांना घरकुलांच वाटप करण्यात आले. सोडत प्रक्रियेसाठी प्रेम ठाकरे, वैशाली भील, टीना ठाकरे आणि राधिका पाडवी या चिमुकल्या मुलींच्या हस्ते चिठ्ठया काढण्यात आल्या. शासन नियमानुसार १५ हजार रुपये भरलेले ५८ पात्र लाभार्थ्यांना घरकुलांसाठी प्राधान्य देत प्रथम सोडत काढण्यात आली. त्यानंतर उर्वरित १९५ घरकुलांसाठी ६५३ पात्र लाभार्थ्यांमधून निवड झाली. याप्रसंगी आमदार चंद्रकांत रघुवंशी, नगराध्यक्षा रत्ना रघुवंशी, उपनगराध्यक्ष प्रथमेश चौधरी, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी राहुल वाघ, प्रांताधिकारी बी.ए.कापसे उपस्थित होते. घरकुलांच्य लाभार्थ्यांमध्ये कोणताही संभ्रम निर्माण होऊ नये आणि निवड प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने पार पडावी, यासाठी नगरपरिषदेने मोठ्या स्क्रीनची व्यवस्था केली होती. तसेच यावेळी सोडतीचे चित्रीकरण करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prithviraj Chavan : मनोज जरांगे-पाटलांचे नेतृत्व संपवायचे त्याचवेळी एकनाथ शिंदे यांच्यासारख्या नेत्यांना बदनाम करण्याचा कुटील डाव

Pakistan Crisis: बापरे! पाकिस्तानात एका गॅस सिलिंडरची किंमत पोहचली ७ हजारांवर; कारण काय?

Sukanya Samruddhi Yojna : घरात तीन मुली आहेत? मग टेन्शन सोडा; जाणून घ्या सुकन्या समृद्धी योजनेच्या नियमांतर्गत कशी उभी राहील कोटींची संपत्ती!

Jailer 2 Box Office: रजनीकांत यांचा बॉक्स ऑफिसवर जलवा! १० दिवसांत जगभरात ६४१ कोटींची कमाई

पुढच्या सात दिवसांत ४ राशींचं नशीब चमकणार! धनलाभासह करिअरमध्ये प्रगतीचे योग

SCROLL FOR NEXT