नाशिक

नारायण सुर्वे : समाजाला अंतुर्मख करणारा कवी

CD
फोटो -NSK26H32423 नारायण सुर्वेंच्या कवितेतून स्त्रीभानाचा जागर ----------------------------------- दुःखापलीकडे जाऊन स्त्रीचा स्वाभिमान, संघर्ष आणि स्वातंत्र्य अधोरेखित करणारी सुर्वे यांची कविता आजही समाजाला अंतर्मुख करते. अन्यायाला प्रश्न विचारत स्वतःची ओळख निर्माण करणारी स्त्री सुर्वे यांच्या कवितेतून पुरुषसत्ताक व्यवस्थेला आव्हान देते. शब्दांतून क्रांती घडविणाऱ्या क्रांतिकारी कवीच्या जन्मशताब्दीनिमित्त... - स्मिता गोविंद पानसरे, अहिल्यानगर कविवर्य नारायण सुर्वेंनी आपल्या कवितेमध्ये चितारलेली स्त्री ही केवळ दुःख सहन करणारी, अश्रू ढाळणारी किंवा पुरुषांच्या आधारावर जगणारी अशी स्त्री नाही. तर ती कष्ट करणारी, संघर्ष करणारी, अन्यायाविरुद्ध उभी राहणारी आणि समाजाने तिच्यासाठी आखून दिलेल्या चौकटी मोडून स्वतःच्या अस्तित्वाची एक नवी चौकट उभी करणारी आहे. सूर्वेंच्या कवितेतील स्त्री कडे पाहताना जाणवते, की तिचे दुःख मांडणे एवढाच कवीचा उद्देश नाही, तर त्या दुःखाच्या मुळाशी असलेल्या सामाजिक व्यवस्थेला प्रश्न विचारणे हा त्यांच्या कवितेचा महत्त्वाचा आशय आहे. स्वतः कामगार वर्गाच्या जगण्यातून, त्या कष्टाच्या अनुभवातून पुढे आलेले सुर्वे यांनी स्त्रीला तिच्या जगण्याच्या संघर्षापासून वेगळे पाहिलेले नाही. ती घर चालवणारी असली, संसाराचा भार वाहणारी असली, कष्ट करूनही उपेक्षित राहणारी अशी स्त्री ही त्यांच्या कवितेमध्ये आहेच, पण तिची ओळख केवळ त्याग, सहनशीलता आणि ममता या गुणांपुरती मर्यादित नाही. तर ती परिस्थितीशी दोन हात करणारी आहे. तिच्या जगण्यामध्ये वेदना आहेत, पण त्या वेदनांनी तिला निष्क्रिय बनवलेले नाही, उलट जगण्याची जिद्द आणि प्रतिकार करण्याची ताकद दिलेली आहे. ‘मास्तर तुमचंच नाव लिवा..’ नारायण सुर्वे यांच्या या कवितेतील स्त्रीचा हा आवाज केवळ एका असहाय्य स्त्रीची अगतिकता नाही तर तो समाजाच्या पुरुषसत्ताक नैतिकतेला दिलेला धक्का आहे. मुलाच्या जन्म नोंदणीसाठी आलेल्या देहविक्री करणाऱ्या स्त्रीला मास्तर वडिलांचे नाव विचारतात तेव्हा ती म्हणते,‘कनच्याबी देवाचे नाव नगा लिवू,.. माणसाचंच लिवा’. या ओळींमध्ये सुर्वे एका स्त्रीची व्यथा मांडताना, समाजाच्या दुटप्पी नैतिकतेवरही बोट ठेवताना दिसतात. स्त्रीच्या चारित्र्याचे मोजमाप करणारा समाज पुरुषाच्या जबाबदारीबद्दल मात्र गप्प राहताना दिसतो. सुर्वेंच्या आणखी एका कवितेतील स्त्रीचं एक वेगळे रूप मला अधिक भावतं ते म्हणतात, " मी गेल्यावर खुशाल नवघर कर "...... यामध्ये एका पुरुषाने आपल्या पश्चात स्त्रीने नवे घर करावे, नव्याने संसार उभा करावा असं सांगणारी ही केवळ प्रेमाची अभिव्यक्ती नाही. तर स्त्रीचे आयुष्य तिच्या पतीच्या अस्तित्वाशी कायमचे बांधून ठेवणाऱ्या समाज व्यवस्थेला दिलेले ते आव्हान आहे. पतीच्या मृत्यूनंतर स्त्रीने आठवणींच्या ओझ्याखाली आयुष्य घालवावे.तिच्या इच्छांना पूर्णविराम द्यावा. तिने पुनर्विवाहाचा विचारही करू नये,अशी अपेक्षा असणाऱ्या समाजासमोर ही कविता एक वेगळा विचार मांडताना दिसते. .

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IDBI Bank Privatisation : आयडीबीआय बँक झाली पूर्णपणे खाजगी! ५२,८७८ कोटी रुपयांना ६०% हिस्सा कॅनेडियन कंपनीला विकण्यास मंजुरी

Pune News : पुणे जिल्ह्यातील दुष्काळी तालुक्यांची संख्या आठवरून दहा; जुन्नर, आंबेगावचाही दुष्काळग्रस्त तालुक्यांत समावेश

Maharashtra Live News : दुष्काळ आणि नापिकीच्या विवंचनेतून चंद्रपुरात ३५ वर्षीय शेतकऱ्याने संपवले जीवन

Sugarcane Rate Agitation : ऊस दराचा भडका! ३१ तासांनंतर महामार्गावरील चक्काजाम मागे; केंद्रीय मंत्र्यांच्या घराकडे 'शेतकरी पदयात्रा' सुरू, साताऱ्यात 'काटा बंद'चा इशारा!

Sinhgad Fraud News : शंभर कोटींच्या बिनव्याजी कर्जाचे आमिष; जाधवर संस्थेची ८७.६१ लाखांची फसवणूक झाल्याची तक्रार; नऱ्हे पोलिसांकडून तपास सुरू

SCROLL FOR NEXT