नाशिक

पद्मश्री नारायण सुर्वे यांना मरणोत्तर डी. लिट. द्या

CD
टूडे साठी -------------- पद्मश्री नारायण सुर्वे यांना मरणोत्तर डी. लिट. द्या मुक्त विद्यापीठाकडे मागणी सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. १४ : कवी पद्मश्री नारायण सुर्वे यांना मरणोत्तर ‘डी. लिट.’ ही सन्माननीय पदवी प्रदान करावी आणि यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात त्यांच्या नावाने अध्यासन सुरू करावे, अशी मागणी कविवर्य नारायण सुर्वे सार्वजनिक वाचनालयातर्फे विद्यापीठाकडे करण्यात आली आहे. यासंदर्भातील निवेदन विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. संजीव सोनवणे यांना देण्यात आले. पद्मश्री नारायण सुर्वे यांच्या जन्मशताब्दी वर्षाचा समारोप गुरुवारी (ता. १५) होत आहे. या पार्श्वभूमीवर त्यांच्या साहित्यिक आणि सामाजिक योगदानाचा गौरव व्हावा, यासाठी निवेदन देण्यात आले आहे. नारायण सुर्वे यांनी ‘माझे विद्यापीठ’, ‘ऐसा गा मी ब्रह्म’, ‘नवी सनद’ आणि ‘नव्या माणसाचे आगमन’ यांसारख्या काव्यसंग्रहांतून कष्टकरी, श्रमिक आणि वंचित समाजाचे जीवन, संघर्ष आणि स्वप्ने प्रभावीपणे मांडली. त्यांच्या कवितांनी मराठी साहित्याला नवी दिशा दिली. त्यांच्या साहित्याचा विद्यापीठीय आणि शालेय अभ्यासक्रमातही समावेश आहे. भारत सरकारने त्यांना पद्मश्री पुरस्काराने, तर सोव्हिएत लँड नेहरू पुरस्कारानेही गौरवले होते. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाने लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांना मरणोत्तर डी. लिट. पदवी देऊन गौरव केला होता. त्याच धर्तीवर नारायण सुर्वे यांनाही मरणोत्तर डी. लिट. द्यावी, अशी अपेक्षा निवेदनात व्यक्त करण्यात आली आहे. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाने शिक्षणाच्या पारंपरिक चौकटीपलीकडे जाऊन समाजाभिमुख कार्य केले आहे. त्यामुळे श्रमिकांच्या जीवनाला कवितेतून अभिव्यक्ती देणाऱ्या सुर्वे यांच्या नावाने अध्यासन सुरू केल्यास त्यांच्या साहित्याचा अभ्यास, संशोधन आणि विचारांचा प्रसार होण्यास मदत होईल, असे निवेदनात म्हटले आहे. निवेदनावर कविवर्य नारायण सुर्वे सार्वजनिक वाचनालयाचे सचिव राजू नाईक, ज्येष्ठ विचारवंत डॉ. रावसाहेब कसबे, ‘सकाळ’ उत्तर महाराष्ट्र आवृत्तीचे निवासी संपादक अभय सुपेकर, ज्येष्ठ समाजवादी नेते शांताराम चव्हाण, वाचनालयाचे विश्वस्त राजू देसले आणि डॉ. विशाल जाधव यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. नारायण सुर्वे यांना मरणोत्तर डी. लिट. आणि अध्यासनाद्वारे गौरवणे हा केवळ एका महान कवीचा सन्मान नसून श्रमिकांच्या जीवनसंघर्षाला साहित्याच्या केंद्रस्थानी आणणाऱ्या प्रतिभावंताच्या कार्याचा सन्मान ठरेल, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. -----------------

कोल्हापूरच्या विश्वजित मोरेने अमेरिकेत इतिहास रचला; जागतिक कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेच्या फायनलमध्ये पोहोचणारा पहिला भारतीय

ही हिरोइन वाटतंच नाही... कसा होता 'मराठी मिडीयम' मालिकेचा कालचा भाग? नेटकऱ्यांना पडलाय एकच प्रश्न की...

IND vs NZ : हार्दिकचा पत्ता कट करायला, मुंबईचा २३ वर्षीय ऑल राऊंडर येतोय; न्यूझीलंड दौऱ्यासाठी वन डे संघात निवडीची जोरदार चर्चा...

Maharashtra Live News : दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी ५ हजार रुपयांची मदत; मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

SPPU Campus Agitation Row : पुणे विद्यापीठात आंदोलने, मोर्चे आणि निदर्शनांवर बंदी! व्यवस्थापन परिषदेच्या निर्णयावरून विद्यार्थी संघटना आक्रमक

SCROLL FOR NEXT