नाशिक

खलाणे येथे महावीर पतसंस्थेची २६ वी वार्षिक सभा उत्साहात

CD
SKD26B04369 खलाणे : पतसंस्थेच्या सभासदांना विविध योजनेविषयी माहिती देताना संस्थेचे चेअरमन रोशन टाटिया. -------- खलाणेत महिलांसाठी ‘नारीशक्ती सन्मान’ योजना रोशन टाटिया : महावीर पतसंस्थेची वार्षिक सभा उत्साहात सकाळ वृत्तसेवा शिंदखेडा, ता. २० : खलाणे येथील महावीर ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेची २६ वी वार्षिक सर्वसाधारण सभा संस्थेचे चेअरमन रोशन टाटिया यांच्या अध्यक्षतेखाली खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. या वेळी महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी ‘नारीशक्ती सन्मान योजना’ सुरू करण्याची घोषणा करण्यात आली असून, या योजनेंतर्गत महिलांना १० टक्के व्याजदराने त्वरित कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे चेअरमन रोशन टाटिया यांनी सांगितले. सभेच्या प्रारंभी प्रकाश वाघ, भुरेसिंग गिरासे, विश्वास भदाणे, खंडेराव ईशी, छबिलाल माळी आणि शिवदास वाल्हे यांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले. महावीर ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था ही ग्रामीण भागातील अग्रगण्य संस्था असून, कोणत्याही राजकीय वलयाशिवाय सभासदांना आर्थिक सेवा देण्यावर संस्थेचा भर आहे. शेतकऱ्यांना त्वरित कर्ज उपलब्ध करून देण्यासह सोनेतारण कर्ज आणि विविध कर्ज योजनांच्या माध्यमातून संस्था सभासदांना मदत करीत आहे. संस्थेच्या वाढत्या सभासदसंख्येमुळे तिच्यावरील विश्वास अधोरेखित होत असल्याचे या वेळी नमूद करण्यात आले. महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे, तसेच नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी प्रोत्साहन देणे, हा ‘नारीशक्ती सन्मान योजने’चा प्रमुख उद्देश आहे. या योजनेमुळे महिलांना आर्थिक स्वावलंबनाच्या दिशेने वाटचाल करण्यास मदत होईल, असा विश्वास श्री. टाटिया यांनी व्यक्त केला. या वेळी पंचायत समितीचे उपसभापती दरबार गिरासे, गुलाब वाले, श्रीराम भदाणे, काशीनाथ वाघ, सुनील पवार आदी मान्यवर उपस्थित होते. गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव दरवर्षीच्या परंपरेनुसार यंदाही गुणवंत विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण करून त्यांचा गौरव करण्यात आला. तसेच, संस्थेला जिल्हास्तरीय पुरस्कार मिळाल्याबद्दल संस्थेचे संस्थापक रमेश टाटिया यांचा विजयसिंग गिरासे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. संस्थेच्या प्रगतीत योगदान देणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांचाही या वेळी गौरव करण्यात आला. सभेला संस्थेचे संस्थापक रमेश टाटिया, व्हा. चेअरमन शिवाजी वाघ, संचालक पारसमल टाटिया, देविदास वाल्हे, भैया गिरासे, मनोहर ईशी, दारासिंग गिरासे, युवराज माळी, पंडित देसले, सरला बहिरुनवाल, कलाबाई वाल्हे आणि भिवा पुंजबिल आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tiger Shroff Attack: टायगर श्राफवरील गोळीबारानंतर हल्लेखोरांनी हँडलर्सना काय पाठवला संदेश?

PAK vs ENG : बाबर आझम पुन्हा फेल गेला... पण, एक असा विक्रम ज्यात शुभमन गिलच्या पंक्तीत जाऊन बसला; Video

ना कोणता आजार, ना प्रकृतीची तक्रार! गरबा खेळताना ३० वर्षीय तरुणाचा मृत्यू; छातीत अचानक कळ आली अन्...

Dussehra 2026: दसऱ्याला सोनं म्हणून आपट्याचीच पानं का देतात? राजा रघु आणि कुबेराची ही पौराणिक कथा जाणून घ्या

Latest Marathi News Live Update : नारायण गडावरील मनोज जरांगेंच्या मेळाव्याला तुफान गर्दी; विरोधकांच्या टीकेला प्रत्युत्तर?

SCROLL FOR NEXT