व्यसनमुक्त तरुणाईसाठी
‘नशामुक्त जळगाव’ अभियान
पोलिस प्रशासन आणि वैशाली फाउंडेशनचा उपक्रम
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. १५ : तरुणांमधील वाढत्या व्यसनाधीनतेला आळा घालून त्यांना व्यसनमुक्त जीवनाकडे वळविण्यासाठी जळगाव जिल्हा पोलिस प्रशासन आणि वैशाली फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने ‘नशामुक्त जळगाव’ अभियान राबविण्यात येणार आहे. या उपक्रमाचा प्रारंभ शनिवारी (ता. १७) दुपारी दोन वाजता छत्रपती संभाजीराजे नाट्यगृहात आयोजित विशेष कार्यक्रमाने होणार आहे.
या अभियानाची माहिती वैशाली फाउंडेशनच्या अध्यक्षा तथा नगरसेविका वैशाली पाटील यांनी गुरुवारी (ता. १५) पत्रकार परिषदेत दिली. यावेळी नितीन विसपुते उपस्थित होते. जळगाव शहरासह जिल्ह्यातील तरुणाई व्यसनांच्या विळख्यात अडकत असल्याची चिंता व्यक्त करत, या समस्येवर प्रभावी उपाययोजना करण्यासाठी अभियान हाती घेतल्याचे पाटील यांनी सांगितले. व्यसनाधीन तरुणांना त्यातून बाहेर काढणे आणि त्यांच्यात जनजागृती करणे, हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश आहे.
पालकांनाही मार्गदर्शन
१७ ऑक्टोबरच्या कार्यक्रमात शहरातील विविध शाळा आणि महाविद्यालयांतील विद्यार्थी तसेच त्यांचे पालक सहभागी होणार आहेत. यावेळी पोलिस प्रशासनाकडून पालकांना व्यसनांचे दुष्परिणाम आणि तरुणांना व्यसनांपासून दूर ठेवण्यासाठी घ्यावयाच्या काळजीबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे. ‘तरुणांना व्यसनमुक्त करण्याची जबाबदारी केवळ पोलिसांची नसून पालकांचीही आहे. त्यामुळे कुटुंब आणि प्रशासनाने एकत्रितपणे प्रयत्न करणे आवश्यक आहे. हा कार्यक्रम अभियानाची सुरुवात असून, भविष्यात टप्प्याटप्प्याने त्याची व्याप्ती वाढविण्यात येईल,’ असे वैशाली पाटील यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.