Agar Pramukh Savita Kale giving instructions to conductors and drivers at the bus depot. esakal
नाशिक

Nashik News : लासलगावहून नाशिक, चांदवडसाठी प्रतिदिन 2 बस! शालेय विद्यार्थ्यांची परवड काही प्रमाणात थांबणार

Nashik News : लासलगाव ते नाशिक आणि लासलगाव ते चांदवड या मार्गावर प्रतिदिन दोन बसच्या अतिरिक्त फेऱ्या सुरू करण्यात येत आहेत, अशी माहिती लासलगाव बस आगारप्रमुख सविता काळे यांनी दिली.

सकाळ वृत्तसेवा

लासलगाव : लासलगाव ते नाशिक आणि लासलगाव ते चांदवड या मार्गावर प्रतिदिन दोन बसच्या अतिरिक्त फेऱ्या सुरू करण्यात येत आहेत, अशी माहिती लासलगाव बस आगारप्रमुख सविता काळे यांनी दिली. लासलगाव बस आगारात सविता काळे यांनी अधिकारी अशोक महाजन यांच्यासह सर्व चालक व वाहकांची बैठक घेतली.

नागरिक, महिला व शालेय विद्यार्थ्यांचे हाल होणार नाहीत, अशा पद्धतीने बससेवा सुरू करावी व सौजन्यपूर्ण वागणूक द्यावी, अशा सूचना सविता काळे यांनी केल्या. (Nashik 2 MSRTC buses daily from Lasalgaon to Chandwad marathi news)

लासलगाव ते चांदवड मार्गावर बसफेऱ्या कमी आहेत, अशी प्रवासी संघटना, शालेय विद्यार्थ्यांची मागणी होती. त्यामुळे या मार्गावर अतिरिक्त दोन बसफेऱ्या सुरू करण्यात आली आहे. लासलगाव येथून नाशिकला जाण्यासाठी व नाशिकहून लासलगावला येण्यासाठी दोन अतिरिक्त बसफेऱ्या वाढविण्यात आल्याचे आगरप्रमुख सविता काळे यांनी सांगितले.

"लासलगावला काॅलेज, शाळा सुटल्यानंतर अपुऱ्या बसमुळे विद्यार्थी रस्त्यावर उभे राहतात. जीव धोक्यात घालून खासगी वाहनांची मदत घेत असल्याचे चित्र दिसते. बसची कमी संख्या हेच कारण आहे. बस संख्या वाढवावी. महामंडळाने विद्यार्थ्यांच्या जीवनाशी खेळ खेळू नये."

-राजेंद्र राणा, उद्योजक, लासलगाव

"केवळ बससेवा नसल्याने लासलगावला विद्यार्थ्यांचे अतोनात हाल होत आहे. केवळ तटपुंज्या बस वाढवून हा प्रश्न सुटणार नाही. सध्या परीक्षेचे दिवस आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही, याची काळजी संबंधित विभागाने घ्यावी, अन्यथा शिवसेनेला वेगळ्या मार्गाने विचार करावा लागेल."-शिवा सुराशे, माजी सभापती, पंचायत समिती, निफाड (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Akshaya Tritiya Gold 2026: सोनं वाढेल की घसरेल? ‘भाव पडल्यावर खरेदी’चा मोतीलाल ओसवालचा सल्ला

Iran-Us War: आता काय बिनसलं? होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा बंद; कारण सांगत इराणचा कठोर निर्णय

रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' चित्रपटात झळकणार गायक अतुल गोगावलेचा लेक, गाण्यात दिसली झलक

RCB vs DC: फॉर्ममध्ये असलेल्या बंगळुरूविरुद्ध अक्षर पटेलने जिंकला टॉस! बर्थडे बॉय केएल राहुलकडे असणार लक्ष; पाहा Playing XI

MPSC Success : दगड फोडणाऱ्याची मुलगी झाली अधिकारी! लोणीच्या मोहिनीची महसूल सहाय्यकपदावर झेप; तिचा संघर्ष वाचून डोळ्यात येईल पाणी

SCROLL FOR NEXT