mobile medical unit team esakal
नाशिक

Nashik News : प्रधानमंत्री जनमन योजनेंतर्गत 5 मोबाईल मेडिकल युनिट पथके; नागरिकांना मिळणार आरोग्य सुविधा

Nashik : प्रधानमंत्री जनमन योजनेंतर्गत आदिम कातकरी समाजाची वास्तव्य असलेल्या आठ तालुक्यांसाठी पाच मोबाईल मेडिकल युनिट पथके देण्यात आली आहेत.

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : जिल्ह्यातील आदिवासी तालुक्यांमधील आदिम कातकरी समाजाला तत्काळ आरोग्यसेवा मिळाव्यात, यासाठी प्रधानमंत्री जनमन योजनेंतर्गत आदिम कातकरी समाजाची वास्तव्य असलेल्या आठ तालुक्यांसाठी पाच मोबाईल मेडिकल युनिट पथके देण्यात आली आहेत. आदिवासी समाज हा देशाच्या विविध भागांमध्ये गावांपासून दूरच्या क्षेत्रात राहणारा आहे. पात्र असूनही त्यांना केंद्र शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळण्यासाठी अनेक अडचणी येत होत्या. (Nashik Pradhan Mantri Janman Yojana in district marathi news)

त्यासाठी केंद्र शासनाने निकषात बदल केले आहेत. जातीचे दाखले, आधारकार्ड देण्याची मोहीम मिशन मोडवर राबविण्यात आली. जिल्ह्यात आदिम कातकरी समाज आहे. प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय महाअभियानांतर्गत कातकरी समाजाला ११ मूलभूत सुविधा देण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून सर्वेक्षण करण्यात आले.

साधारणः जिल्हाभरात १८ हजार कातकरी कुटुंब आहेत. या कुटुंबांना घर, स्वच्छ पिण्याचे पाणी, रस्ते, वीज, शिक्षण, आरोग्य, वसतिगृह, जातीचे दाखले, कौशल्य प्रशिक्षण यांसह विविध लाभ देण्याची सुरवात करण्यात आली आहे. यातच या कुटुंबातील व्यक्तींना आरोग्यसेवा मिळावी, यासाठी प्रधानमंत्री जनमन योजनेंतर्गत आदिम कातकरी समाजाची वास्तव्य असलेल्या आठ तालुक्यांसाठी पाच मोबाईल मेडिकल युनिट पथकाची निर्मिती करण्यात आली आहे. (latest marathi news)

या पथकात वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, औषध निर्माण अधिकारी, प्रयोगशाळा तंत्रज्ञ यांचा समावेश आहे. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी या संदर्भात राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत प्रत्येक मोबाईल मेडिकल युनिटमध्ये चार वैद्यकीय कर्मचारी, असे १६ कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीचे आदेश दिले आहेत. यापूर्वी एक मोबाईल मेडिकल युनिटचे पथक कार्यरत होते. यात आता चार पथकांची भर पडल्याने पाच पथकांमार्फत आरोग्य सुविधा दिल्या जाणार आहेत.

प्रत्येक सदस्याची होणार आरोग्य तपासणी

जिल्ह्यातील दिंडोरी, इगतपुरी, नांदगाव, नाशिक, निफाड, पेठ, सिन्नर, त्र्यंबकेश्वर या तालुक्यांतील आदिम कातकरी समाजातील वंचित घटकांसाठी आरोग्य सुविधा देण्याचे काम मोबाईल मेडिकल युनिट पथक करणार आहे. यात प्रामुख्याने पथकातील आरोग्य कर्मचारी घरोघरी जाऊन भेटी देतील.

कातकरी समाजातील कुटुंबातील सर्व लोकांची तपासणी करतील. यात गंभीर आजार असलेल्यांना जिल्हा रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल केले जाईल. यातून प्रत्येक व्यक्तींचा आरोग्य तक्ता तयार केला जाणार असून, आवश्यक त्या आरोग्यसेवा पुरविल्या जाणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नरेंद्र मोदींचा नेपाळच्या पंतप्रधानांना फोन! भारतीय नागरिकांच्या मदतीसाठी हेल्पलाईन क्रमांक जारी

Pharmacy Direct Second Year: फार्मसी थेट द्वितीय वर्ष प्रवेशाची तिसरी यादी जाहीर; १२०८ विद्यार्थ्यांना संधी, ९४१ जणांना पसंतीचे महाविद्यालय

ICC Test Ranking मध्ये उलथापालथ! बुमराहचं वर्चस्व संपलं, ऑस्ट्रेलियन दिग्गजाने हिसकावली नंबर-१ची खुर्ची

IND vs SL, 2nd Test, 4th Day: श्रीलंकेला आघाडी घेण्यात यश, पण भारताची सामन्यावर मजबूत पकड; सूरियाबंदाराचं शतक हुकलं

Narali Purnima 2026: नारळी पौर्णिमेच्या दिवशी श्रीफळाचा 'हा' उपाय करा; मनातील २ महत्त्वाच्या इच्छा होतील पूर्ण!

SCROLL FOR NEXT