Car Accident esakal
नाशिक

Nashik Accident News : एकलहरे रोड वर कारच्या अपघातात 1 ठार 3 जखमी

Nashik Accident : एकलहरे रोड वर गवळी बाबा मंदिर जवळ पहाटेच्या सुमारास झाडावर कार आदळून झालेल्या अपघातात एक जण ठार झाला असून तीन जण जखमी झाले आहेत.

सकाळ वृत्तसेवा

Nashik Accident News : येथील एकलहरे रोड वर गवळी बाबा मंदिर जवळ पहाटेच्या सुमारास झाडावर कार आदळून झालेल्या अपघातात एक जण ठार झाला असून तीन जण जखमी झाले आहेत. जखमींना बिटको रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, एकलहरे रोड वरील गवळी बाबा मंदिरा जवळ बुधवारी (ता. 6) पहाटेच्या सुमारास एकलहरे कडे भरधाव वेगाने जाणारी कार (एमएच 14 सीसी 9632) रस्त्याच्या बाजूला असेलल्या निलगिरीच्या झाडावर आदळून अपघात झाला. (Nashik Accident 1 killed 3 injured in car accident on Eklahare Road)

या अपघातात रोहीत राजेंद्र रणशूर (34) वर्षे, मोहिते गॅरेज मागे, अरिंगळे मळा, नाशिकरोड येथील तरुण मृत झाला असून इतर तीन जण जखमी झाले आहेत. त्यांच्यावर बिटको रुग्णालयात उपचार सुरु आहे.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामदास शेळके, गुन्हे शाखेचे कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेतली. मृत रोहीत रणशूर हा नाशिक औष्णिक वीज केंद्रातील कर्मचारी असल्याचे समजते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: पिंपरीत आंब्याच्या आमिषाने अडीच वर्षांच्या चिमुरडीला खोलीत बोलावून लैंगिक अत्याचार; ४७ वर्षीय आरोपीला अटक

G-Pay Pocket Money: Google Pay वर नवं ‘Pocket Money’ फीचर आलं! नेमकं काय आहे जाणून घ्या

झी मराठीवर नुकतीच सुरु झालेली दीप ज्योती आहे कन्नड मालिकेचा रिमेक ! अशी असेल पुढील कथा

Team India: 'गौतम गंभीरचे अनेक शत्रू, ५ सिलेक्टर्सपैकी ४ जणं....' माजी संघसहकाऱ्याचं खळबळजनक दावा

Latest Marathi News Live Update: अश्विनी चेनानीला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली

SCROLL FOR NEXT